दिवस विश्वक्रांतीचा

१२ फेब्रुवारी २००१ ही तारीख भविष्यासाठी अतिशय महत्वाची आहे.. आणि या टप्पावरच आज १२ वर्ष पुर्ण झाल्यानंतर या सिद्धांतावर बोलणं महत्वाच आह.. गुणसूत्रांचा सूसुत्र अभ्यास झाल्यावर तुम्हाला तुमच्या डिएनए, आरएनएचा अभ्यास करुन तुम्हाला खास तुमच्या प्रकृतीसाठी योग्य असणारी औषधं मिळणार आहेत..

जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2013, 12:03 AM IST

www.24taas.com, मुंबई
१२ फेब्रुवारी २००१ ही तारीख भविष्यासाठी अतिशय महत्वाची आहे.. आणि या टप्पावरच आज १२ वर्ष पुर्ण झाल्यानंतर या सिद्धांतावर बोलणं महत्वाच आह.. गुणसूत्रांचा सूसुत्र अभ्यास झाल्यावर तुम्हाला तुमच्या डिएनए, आरएनएचा अभ्यास करुन तुम्हाला खास तुमच्या प्रकृतीसाठी योग्य असणारी औषधं मिळणार आहेत.. केवळ एवढच नाही तर भविष्यात निरोगीच आणि शतायुषी पिढी जन्माला येणार आहे..
विश्वात असिमीत अशा दोनच गोष्टी आहेत. एक ह्या विश्वाचा पसारा आणि दूसरा म्हणजे माणसाचा वेडेपणा. त्यातील पहिला भाग एक दिवस कदाचित आपल्याला सिमीत दिसेल. पण माणसाचा वेडेपणा हा मात्र नेहमीत असिमीतच राहील
अल्बर्ट आईनस्टाईनची हे वाक्य आज काळाच्या कसोटीवर पुन्हा खरं ठरतय.. खरतर गंमतीनं, वेडेपणा हा गुणसूत्रातच असतो असं म्हणून सत्य नाकारण्या-या माणसांच्या दुनियेत काही माणसांना आता मानवाच्या गुणसूत्रांच्या अभ्यासाचांच जणू वेड लागलय.. होय.. क्रेग व्हेटॉर या जिवशास्त्रात १२ फेब्रुवारीची विश्वक्रांती घडवणा-या शास्त्रज्ञाच्या संशोधनाला आता नवनवे आयाम मिळतायत.. डीएनएचे फ्रिक्वेसींग किवा जनूकांच्या गुणसूत्रांचे वर्गीकरण करणं ही खर्चिक प्रक्रिया पार पाडत, क्रेग यांनी जगासमोर आणलेल्या सिलीको बायोलॉजीच्या सिध्दांताला आता एक तप उलटतय.. त्यावेळी यासाठी सुमारे १५० हजार कोंटीचा डॉलरचा खर्च आला होता.. त्या सिलीको बायलोजीवर आता पुन्हा नव्यानं संसोधन सुरुच आहे. जीन्स म्हणजे नेमक काय ? अनुवाशिंकेता नेमकी कोणत्या गुणावर ठरते? आपले जीन्स भविष्यात कसे हस्तातंरण करता येईल? अशा नानाविध प्रश्नांवर संशोधक काम करतायत.. पण त्याचवेळी हा प्रचंड खर्चही महत्वाचा आहे.. १२ वर्षानंतर या सुरुवातीच्या दीड हजार कोटी डॉलर खर्चात एक हजार पटीनं घट झालीय, त्याचप्रमाणे आणखी तीन ते चार वर्षात हा खर्च हजारपटीनं कमी होईल असा दावा करण्यात आलाय.. पण याचबरोबर आता हा खर्च कमी करण्यासाठी आर्चोन एक्स ही दहा मिलीयन डॉलरची एक स्पर्धाही ठेवण्यात आलीय.. जो संशोधक १०० ह्युमन जेनॉमचे १०,००० डॉलरमध्ये डिकोटींग करेल त्याला हे बक्षीस मिळणार आहे.. अर्थात हे जर संशोधकाना शक्य झालं,तर नव्या विश्वक्रांतीला सामोरं जाताना आपल्यालाही याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळणार आहे.. या सा-या अभ्यासात महत्वाची ठरणार आहेत ती म्हणजे मानवाची मुलपेशी
गर्भ म्हणजे ऐंब्रॉयनिक मूलपेशी आणि प्रौढ म्हणजे एडल्ट मूलपेशी अशा दोन मूलपेशीत शास्त्रज्ञांनी वर्गीकरण केलं आहे. जन्मलेल्या बाळाची नाळ ही माणसाच्या आयुष्यभऱासाठी महत्वाची ठरणार आहेत. गर्भनाळेतील हेमेटोपोएटीक आणि मिझलनकेमल या दोन मूलपेशी असतात.. जन्मलेल्या बाळापासून मिझनकेमल या पेशी वेगळ्या करता येतात. आणि त्यांच सर्वंधन करुन भविष्यात त्याच व्यक्तीच्या हृद्यविकारासारख्या अनेक अनुवांशिक आजारावर महत्वाच्या ठरु शकणार आहेत.. २००८ साली दातातल्या मूलपेशीचा वापर करुन मेंदूवर उपचार करण्यात आले होते.. त्यामुळे हा सिद्धांत भविष्यात आवाक्यात आला तर मानवाला आपली नाळ संवर्धन करणं शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे मिझलनकेमल या मूलपेशीचा अभ्यास करुन त्या व्यक्तीच्या डीएनए प्रमाणे वर्गीकरण करुन योग्य तीच औषध देता येणार आहे. पर्सनालाझीज औषधं ही संकल्पना ख-या अर्थानं रुजेल.
डीएनएचा अभ्यास आणि त्याप्रमाणे उपचार ही संकल्पना आता काळानं आपल्या उंबरठ्यावर आणून ठेवलीय. १२ फेब्रुवारीला २००१ ला याच नव्या विश्वक्रांतीची नांदी ठरली.. आणि आता एका तपानंतर यात अनेक बदल होतायत.. पुढची पिढी याच संशोधनात कदाचीत जन्मेलही आणि सुखी निरोगी आयुष्य जगेल.. पण ही पुढी केवळ सुदृढ शतायुषी माणसं असतील कि विचारहीन पण संवेदना असलेला माणूस नावाचं एक यंत्र या प्रश्नाच उत्तर मिळालं नाहीय.. कदाचित तो पर्यंत आपण वाट पहायची त्या संशोधनाची किवा जुआन एनरिक जे यांच्या ‘एज द फ्यूचर इफ यु कॅन’ यांच्या पुस्तकातल्या त्या गोष्टी सत्यात उतरण्याची..
मानवी देहावर गेली अनेक वर्ष संशोधन होतय.. पण तरीही आजपर्यंत जीवशास्त्रातून उलगडल्या गेल्यायत अवघ्य़ा ६० टक्के गोष्टींची रहस्य.. यावरुन समजेल की या मानवी देहाबद्दलचा अभ्य़ासाचा केवढा पल्ला गाठायचा.. डीएनए, गुणसूत्रे याबाबत क्रेग व्हेंटर यांचा सिलीका बायोलॉजी बदद्ल अभ्यास सुरु होता.. पण त्याच वेळी नेचर आणि सायन्स या जर्नल त्याबद्दल सगळी माहीती अगोदर प्रसिद्ध झाल.. आणि सगळीकडे प्रचंड खळबळ माजली. आज १२ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या सिद्धांताचे अवलोकन करणार आहोत.. कारण भविष्याच्या उंबरठ्यावर भूतकाळाचा अभ्यास वर्तमानाचं भान करणारा असा