भटक्या कुत्र्यांची दहशत

कुत्रा हा अत्यंत इमानी प्राणी मानला गेलाय..त्यामुळेच आज फ्लॅट संस्कृतीतही तो पारखा झाला नाही..पण भटक्या कुत्र्यांमुळे माणसाचा हा विश्वासू मित्र रोषाचं कारण ठरलाय... नाशिकमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने १० ते १२जणांचा चावा घेतलाय...त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय...भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न, भटक्या कुत्र्यांची दहशत.

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 30, 2012, 11:43 PM IST

www.24taas.com,नाशिक
कुत्रा हा अत्यंत इमानी प्राणी मानला गेलाय..त्यामुळेच आज फ्लॅट संस्कृतीतही तो पारखा झाला नाही..पण भटक्या कुत्र्यांमुळे माणसाचा हा विश्वासू मित्र रोषाचं कारण ठरलाय... नाशिकमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने १० ते १२जणांचा चावा घेतलाय...त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय...भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून त्यावरच प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न, भटक्या कुत्र्यांची दहशत.
नाशिकच्या सातपूर परिसरात सकाळी काही शाळकरीमुलं शाळेत निघाली होती...पण वाटेतच एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या अचानकपणे हल्ला केला ...या घटनेमुळे नाशिक शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर बनलाय हे पुन्हा एकदा उघड झालंय..

इमानी प्राणी बनला माणसाचा वैरी !
भटक्या कुत्र्यांची नाशिकमध्ये दहशत !
10 ते 12 जणांना घेतला चावा!

मंगळवारी नाशिकच्या सरकारी दवाखान्यातील इमर्जन्सी वॉर्डमध्ये डॉक्टरांची एकच धावपळ उ़डाली होती..कारण पिसाळलेल्या कुत्रा चावल्यामुळे जखमी झालेल्या १० ते १२ शाळकरी मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. कुणाच्या गालाचा...कुणाच्या हाताचा...कुणाच्या खांद्याचा तर कुणाच्या मानेचा लचका पिसाळलेल्या कुत्र्याने तोडला होता...त्य़ा चिमुकल्यांना वेदना असहाय्य झाल्या होत्या.

नाशिकच्या सातपूर परिसरात श्वान दंशाची ही घटना घडलीय..सकाळी ही मुलं शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती त्याचवेळी पिसाळलेल्या कुत्र्याने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला....त्यानंतर नागरिकांनी जखमी मुलांना तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं...याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जबाबदार धरलंय.

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून महापालिकेकडून त्याकडं दुर्लक्ष केलं जात असल्य़ामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे...या घटनेमुळे नाशिक महापालिकेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्य़ावर आला असून विकास कामांच श्रेय घेण्यात आघाडीवर असलेले लोकप्रतीनिधी मात्र या प्रकरणी प्रशासनावर जबाबदारी टाकून मोकळे झाले आहेत.. मात्र श्वान दंशाच्या या घटनेनंतर आता तरी महापालिकेला जाग येईल का हाच खरा प्रश्न आहे..

सर्वोच्च न्या्यालायाने २६ जानेवारी १९९४ला एक आदेश दिला होता ...त्यानुसार भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास मनाई करण्यात आली... पण भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा मार्ग मात्र खुला ठेवण्यात आला होता....त्यानुसार स्थानिक स्वराज्या संस्थाकडून भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं जातं...पण अनेक ठिकाणी ते केवळ कागदावर असल्यामुळे नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास वर्षानूवर्ष सहन करावा लागतोय.

कुत्रा... आदिमकाळापासून ते पुराणकाळापर्यंत.. आणि पुराणकाळापासून ते आजच्या घडीपर्यंत.. कुत्रा हा माणसाचा सर्वात अत्यंत इमानी प्राणी मानला गेला आहे.... लहान मुलांचा पपी असो वा अलिशान बंगल्यांच संरक्षण करणारा डॉगी असो.. कुत्र्यानं आपला इमानीपणा आणि हुशारी मानवाच्या देखी सिद्ध केलाय.
पण भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे हा इमानी प्राणी बेईमान झाल्याचं चित्र पहायला मिळतंय.....नाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने तर कहर केलाय...शाळेत निघालेल्या १० ते १२जणांचा त्याने चावा घेतलाय....सातपूर परिसरात ही घटना घडली असली तर इतर ठिकाणचीही परिस्थिती काही वेगळी नाही..नाशिकच्या उंटवाडी परिसरातील ही दृष्य पहा.... वाहनाच्या खाली. प्रत्य़ेक घराच्य़ा बाहेर, हे कुत्रे अगदी लांडग्यासारखेच फिरताना पहायला मिळतात.. जनावरांच्या कत्तलखान्यातील घाण नासरडी नदीत टाकली जाते..त्यामुळे इथं कुत्र्यांचा वावर असतो...
नाशिक महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या संखेवर नियंत्रण मिळवण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप तरी यश आलेलं दिसत नाही...नाशिककरांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होत असतांना लोकप्रतिनिधी तसेच पालिका प्रशासन हातावर हात ठेवून गप्प बसलंय..
ही परिस्थीती केवळ नाशिक शहरापूर्तीच मर्यादीत आहे असं नाही तर मायानगरी मुंबई असो की सांस्क़ृतीक राजधानी पुणे सगळीकडं हीच परिस्थिती आज पहायला मिळतेय..पण या समस्याकडं