धम्माल, मजा, मस्ती आणि ‘फुकरे’

मैत्रीवर आधारित चित्रपटांना सध्या चलती दिसून येतेय. मैत्रीवर आधारित फुकरे हा चित्रपट या आठवड्यात रिलीज झालाय. नव्या युगातील तरुणांची बिनधास्तपणे जगण्याची सवय, आयुष्यातील मजा, मस्ती हे सर्व या चित्रपटातून दिसतेय

Updated: Jun 15, 2013, 12:31 PM IST


चित्रपट :
दिग्दर्शक : विपुल वीज
लेखक : मृगदीप सिंग लांबा
कलाकार : मनोज सिंग, अली फजल, पुलकित सम्राट, वरूण शर्मा, ऋचा चड्डा

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मैत्रीवर आधारित चित्रपटांची सध्या चलती दिसून येतेय. मैत्रीवर आधारित ‘फुकरे’ हा चित्रपट या आठवड्यात रिलीज झालाय. नव्या युगातील तरुणांची बिनधास्तपणे जगण्याची सवय, आयुष्यातील मजा, मस्ती हे सर्व या चित्रपटातून दिसतेय. हा एकप्रकारे निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे. यात चार तरुणांची कथा सांगितली आहे ज्यात हे चारही तरुण आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी शॉटकर्ट पद्धतीचा वापर करतात आणि प्रॉब्लेममध्ये फसतात. यामध्ये जी काही मजा, मस्ती, आणि विनोद झाले त्याचा एकत्रित मेळ म्हणजे ‘फुकरे’. यामध्ये धमाल आहे, मज्जा आहे आणि मस्तीही...
निखळ मनोरंजन
‘फुकरे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल वीज आणि लेखक मृगदीप सिंग लांबा यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने लिहून दिग्दर्शित केलीय. यामध्ये निखळ मनोरंजन हाच हेतू ठेवल्याच दिग्दर्शक आणि लेखक सांगतात.
काय आहे कथानक
ही कथा चार तरुण युवकांभोवती फिरते. ज्यात प्रत्येकाचं स्वप्न वेगळ असतं... लाली (मनोज सिंग) याची मोठ्या कॉलेजात जाऊन शिकण्याची इच्छा आहे तर जफरला (अली फजल) संगीतात करिअर करायचंय. हनी (पुलकित सम्राट) आणि चोचा (वरूण शर्मा) या दोघांना पैसे कमवायचेत.
चोच्याला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नांचा अर्थ लावून हनी लॉटरीचे तिकीट घेतो. हे तिकीट आपल्याला पैसे मिळवून देईल, असं चौघांनाही पटतं. त्यानंतर त्यांच्या स्वप्नांना खरी सुरूवात होते. या चारही जणांचे एकच स्वप्न ते म्हणजे पैसा कमवणं आणि या स्वप्नपूर्ती करण्यात ते कसे फसले जातात? त्यातून कसे सावरतात? याची ही कथा... यादरम्यान घडलेली मजा, विनोद या सर्वांचे एकत्रीकरण या चित्रपटात केलंय.
नवख्या कलाकारांची धम्माल
यात चारही तरूण हे नवोदित अभिनेते आहेत. परंतु चित्रपटामध्ये कुठेही त्यांचा नवखेपणा जाणवलेला दिसून येत नाही. ऋचा चड्डानंही सुंदर आभिनय केलाय. यामध्ये जे हास्यविनोद आहेत तेही साधेसोपेपणाने माडंलेले आहेत ज्याची लोकांना भुरळ पडते. यातील संवाद खूप मजेशीर आणि छान आहेत. फुकरेत राम संपत यांनीही सुंदर संगीत दिलंय.

शेवटी काय तर...
जर तुम्हाला आठवड्यभराचा कंटाळा घालवायचा असेल आणि निखळ मनोरंजन हवे असेल तर धमाल, मजा, मस्तीने भरलेला तरूण ‘फुकरे’ पाहण्यास काही हरकत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.