सोनेरी घसरण!

By Jaywant Patil | Last Updated: Monday, April 15, 2013 - 23:35

www.24taas.com, मुंबई
सोन्याची अंगठी... ब्रेसलेट...सोन्याचा हार... असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलीय...गगनाला भिडलेले सोन्याचा भाव आता कमी होवू लागलेत आहेत... गेल्या काही दिवसात हे चित्र पहायला मिळतंय..
सोमवारी सकाळी सोन्याच्या दरात जवळपास तीन टक्के घसरण झाली..आणि सोनं चक्क २७,१०० रुपयांवर येवून पोहोचलं.
१० ग्रॅम सोनं
---------
२५,५०६ रुपये
होय ...एक तोळा सोन्याची किंमत २५,५०३ हजार रुपये झालीय...एप्रिल २०११मध्ये जो भाव होत त्यावर पुन्हा सोनं येवून पोहोचलंय...गेल्या आठवडाभरात हे दर वेगाने खाली आले आहेत..
९ एप्रिल २०१३
३० हजार १५०
----------
१० एप्रिल २०१३
३० हजार २५०
-----------
११ एप्रिल २०१३
२९ हजार ९९०
----------
१२ एप्रिल २०१३
२९हजार ८५०
--------
१३ एप्रिल २०१३
२८ हजार ८००
-----------
१४ एप्रिल २०१३
२९ हजार
--------
१५ एप्रिल २०१३
२७ हजार ५००
सोन्याच्या दरातील घसरण केवळ देशातच नाही तर परदेशातही झाली आहे...सोमावारी सिंगापुरमध्ये सोन्याचे दर चार टक्क्यांनी घसरले..२०११मध्ये जे दर होते तोच दर सोमवारी पहायला मिळाला. सोन्याचे दर कमी झाल्याचं समजताच सोन्याच्या दुकानात ग्राहकांनी गर्दी केली..
सोन्याचा दर घसरला असला तरी हे दर आणखी किती कमी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे...
आणखी किती स्वस्त होणार सोनं ?
२२००० रुपये (प्रति १० ग्रॅम) होणार सोन्याचा दर ?

आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता सोन्याच्या अंतरराष्ट्रीय जाणकारांनी व्यक्त केलीय..आज पर्यंत अंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांनी सोन्यावर लक्ष्य केंद्रीत केलं होतं...पण आता त्यांनी सोन्याऐवजी दुसरीकडं लक्ष्य केंद्रीत केल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होवू लागलीय...जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्यूनि़टी आहे..

सोन्यातली गुंतवणूक ही नेहमीच खात्रीशीर गुंतवणुक मानले जाते...मात्र गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात जी घसरण झालीय ती पहाता सोन्यात गुंतवणूक करणा-यांची झोप उडालीय...सोन्य़ाचे दर घसरण्यामागच्या काही कारणांपैकी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत होत असलेली सुधारणा एक कारण असल्याचं मानलं जातंय..तसेच जगातील मोठ्या गोल्ड फंडपैकी एक सामजल्या जाणा-या एसपीडीआर गोल्ड ट्रस्टने सोनं खरेदीत कपात केली आहे....साय़प्रसच्या सोनं विक्रीच्या योजनेचाही सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला असल्याचं बोललं जातंय..अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून बॉन्ड खरेदी बंद केली जाण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याच्या गुंतवणूकीवर त्याचा परिणाम झाला आहे..या शिवाय अमेरिकेन डॉलर पुन्हा मजबूत झाल्यामुळे सोन्याचा दर घसरु लागला असल्याचं मानलं जातंय..तसेच अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी आल्यामुळेही गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी शेअरवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे..काही मोठ्या संस्थांनीही सोन्यावरचं लक्ष्य काढून घेतलंय...अलिकडच्या काळात भारत सोन्याची आयात वाढल्यामुळे सरकराने आयात करात वाढ केली होती..त्यामुळेही भारतात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती....खरं तर २००८च्या मंदीच्या काळात गुंतवणूकदारांसमोर केवळ सोनं हाच एकमेव पर्याय उरला होता..आणि सोन्यातील गुंतवणुकीतून त्यांना तब्बल ३० टक्के परतावा मिळाला होता..पण आता सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

First Published: Monday, April 15, 2013 - 23:35
comments powered by Disqus