मृत्युचा हाय-वे

खेड परिसरात खासगी बसला झालेल्या भीषण अपघातामुळे या महामार्गावर प्रवास करणं किती जीकरीचं होवून बसलंय हे वेगळ सांगण्याची गरज उरली नाही....

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 20, 2013, 10:14 AM IST

www.24taas.com, मुंबई
खेड परिसरात खासगी बसला झालेल्या भीषण अपघातामुळे या महामार्गावर प्रवास करणं किती जीकरीचं होवून बसलंय हे वेगळ सांगण्याची गरज उरली नाही....या हाय-वेवर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत...गेल्या वर्षभरातील अपघातांची संख्या पहाता य़ा हायवेला मृत्युचा हाय-वे का म्हटलं जातंय हे तुमच्या लक्षात येईल...
मुंबई आणि गोव्याला जोडणारा हा महामार्ग...दररोज हजारो लहान-मोठी वाहनं या महामार्गावरुन जातात...पण गेल्या काही वर्षात हा अपघातांचा मार्ग बनत चालला आहे..या महामार्गाची सुरुवात पनवेलच्या पळस्पेपासून होते...गोव्याला जोडणारा हा महामार्ग रायगड जिल्ह्यातून जातो...दिडशे किलोमीटरचं हे अंतर पास करण्यासाठी सरासरी तीन तासाचा कालावधी लागणं अपेक्षीत आहे...पण रस्त्यावरील खड्डे, अवघड वळणांमुळे हा प्रवास दिवसेंदिवस जीवघेणा ठरु लागला आहे..कर्नाळा, पेण, वडखळ,माणगाव, नागोठाणे या काही ठिकाणी अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत..

अपघात तसेच वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय...मात्र अपघातात मृत्यू झालेल्य़ांची संख्या पहाता हा मृत्यूचा महामार्ग ठरु लागला आहे... विशेष म्हणजे कोकणात तसेच महाबळेश्वरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे या महामार्गावरच्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे...रोज जवळपास १० हजार वाहने या रस्त्यावरुन ये- जा करतात...अवजड वाहनांचा या मार्गावर सतत राबता असल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो..
हा महामार्ग पुढे रत्नागिरी जिल्ह्यातून जातो...कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचं अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसंच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत..त्यामुळं अपघातांच्या संख्येत वाढ झालीय.
मुंबई-गोवा हायवेच्या रुंदीकरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून केवळ चर्चेत आहे. मात्र आतापर्यंत एक किलोमीटरचेही रुंदीकरण झालं नसल्याचं वास्तव आहे. भरमसाठ वाहने आणि अरुंद रस्ता यामुळं अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. त्यामुळं हा मुंबई-गोवा महामार्ग ठरतोय मृत्यूचे प्रवेशद्वार....
मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सपाळा बनलाय...पण राज्यातल्या इतरही महामार्गावरची परिस्थिती थोड्याफार फरकाने अशीच आहे.. शहरापासून खेड्यापर्यंत सगळीचं हीच परिस्थिती पहायला मिळतेय...ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांमध्ये प्रवासी मिळवण्याची स्पर्धा जीवघेणी ठरतेय...

राज्यात दरवर्षी अपघातात मृत्यूमुखी पडणा-यांची ही संख्या डोळ्यात अंजन घालणारी आहे....धोकादायक वळण, मद्यपान करुन वाहन चालवणे, अति वेग, वाहन चालवतांना निष्काळजीपणा ही अपघाताची प्रमुख कारणं आहेत..राज्यात वर्षभरात सरासरी ७० हजार अपघात होतात..
२००५ ते २०११ या सात वर्षात ३ लाख ४९ हजार ७५४ जण जखमी झाले आहेत...
रस्ते अपघाताचं प्रमाण शहराप्रमाणेच लहान लहान शहरात तसेच ग्रामिण भागातही वाढत आहे...ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणा-यांमध्ये प्रवासी मिळवण्यासाठी चढाओढ लागेलेली असते आणि त्यातूनच अपघात होतात...हे रोखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे...वाहन चालवतांनना चालकाचं वेगावर नियंत्रण आवश्यक असते...बहुतेक अपघाताच्या घटनेत वाहकचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याचं समोर आलं आहे...
वाहन चालकांनी वाहन चालवतांना काही गोष्टींची काळजी घेतल्यास अपघातावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.. वाहन चालवतांना वेगावर नियंत्रण ठेवणे, सीट बेल्टचा वापर करणे, मोबाईल फोनचा वापर टाळणे,हेल्मेटचा वापर करणे तसेच वाहतुकीच्या नियमांच पालन केल्यास रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे...
राज्यातील महामार्ग मृत्यूचे सापळे बनत चाललेत आहेत... मुंबई- पुणे य़ा दोन प्रमुख शहरांना जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरची परिस्थिती काही वेगळी नाही...या महामार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला खरं पण वाहनांचा अतीवेग आणि मानवी चुकांमुळे या महामार्गावरचा प्रवास ने जीवघेणा ठरु लागलाय...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे ही महत्वाची शहरं अवघ्या काही तासांच्या अंतरांनी जोडली गेली. मात्र वाहनांचा अतिवेग आणि मानवी चुकांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय. महामार्गावर दरवर्षी सरासरी दीड हजार अपघात होतात. 2012 मध्ये 1147 अपघात झाले असून त्यात 70 जणांचा मृत्यू