अबलख घोडा

अश्व अर्थात घोडा.... स्वत: छत्रपती शिवाजी महाराजही या अश्वलक्ष्मीचे पुजक होते असं म्हटलं जातं.. ज्याचा पागा बळकट त्यांचे राज्य बळकट असं महाराज म्हणत असत. अत्यंत देखण्या, रूबाबदार, इमानी, चपळ अशा जातिवंत जनावरावर कोण बरं प्रेम करणार नाही? आजचा काळ हा महागड्या वाहनांचा असला तरी या जातिवंत प्राण्याचं महत्व तसूभरही कमी झालं नाही...

जयवंत पाटील | Updated: Nov 30, 2012, 11:35 PM IST

www.24taas.com, मुंबई
अश्व अर्थात घोडा.... स्वत: छत्रपती शिवाजी महाराजही या अश्वलक्ष्मीचे पुजक होते असं म्हटलं जातं.. ज्याचा पागा बळकट त्यांचे राज्य बळकट असं महाराज म्हणत असत. अत्यंत देखण्या, रूबाबदार, इमानी, चपळ अशा जातिवंत जनावरावर कोण बरं प्रेम करणार नाही? आजचा काळ हा महागड्या वाहनांचा असला तरी या जातिवंत प्राण्याचं महत्व तसूभरही कमी झालं नाही...
अतिवेगवान कार्स आणि बाईकच्या युगाताही घोडा हा प्राणी आपलं स्थान टिकवून आहे...एकीकडं शहरीकरण होत असतांनाही घोडे पाळणा-यांची संख्या काही कमी झाली नाही...आज रोज नवनव्या कार्स आणि बाईक्सची मॉ़डेल्स बाजारात येत असून त्यांची जोरदार जाहिरातही केली जाते..पण आजच्या जाहिरातीच्या युगातही कोणतीच जाहिरात न करता घोड्याची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते...विशेष म्हणजे घोड्यांची किंमतही काही कमी झाली नाही...

३० लाख रुपये किंमतीचा घोडा !

कारण घोड्याचा आपला एक वेगळाच रुबाब असतो...त्याची वेगळीच ऐट असते...रस्त्याने जाणा-या एकदा महागड्या कारकडं लोक दुर्लक्ष करतील पण समोरून एखादा ऐटबाज घोडा आल्यास त्याच्याकडं सहजासहजी कोणी दुर्लक्ष करणार नाही..कारण हा प्राणीच तेवढा देखणा आहे...

एकदा घोडा खरेदी केला की तो तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो...कारण हा प्राणी जेव्हडा देखणा आहे तेव्हडाच तो इमानी आणि मालकाच्या आज्ञेनंच पालन करणारा आहे. म्हणूनच प्राचीन काळापासून घोड्याने माणसाच्या जीवनात वेगळ स्थान निर्माण केलं आहे. राजेरजवाड्याच्या काळात घोड्याला अनन्यसाधारण महत्व होतं...प्रवासापासून ते युद्ध पर्यंत सगळ्यासाठी घोड्याचा वापर केला जात होता...वेगवान प्राणी म्हणून घोड्याकडं बघितलं जातं होतं...आज काळ बदलला असली तरी त्याचा बेफाम वेग रेसकोर्सच्या मैदानावर अनुभवायला मिळतो...
पूर्वीच्या तुलनेत घोडे पाळणा-यांची संख्या भलेही कमी झाली असली तरी त्याच्या विषयीचं आकर्षण जराही कमी झालं नाही...म्हणूनच आजही घोडे बाजारात घोडा खरेदी करण्यासाठी शौकीन आवर्जून हजेरी लावतात...विशेष अश्वप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे..

घोडा आणि एश्वर्य यांचं पूर्वापार नातं आजही टिकून आहे गरजेसाठी घोडा खरेदी करून उपजीविका करणारे आहेत. तसेच शौक आणि शुभलक्ष्मी म्हणुन घोडे बाळगणारे शैकीन आजही आहेत. घोड्याच्या लिदीचा वास एकदा का नाकात गेला की तो कधीच सुटत नाही असं अश्वप्रेमी सांगतात. त्याची प्रचिती घोड्याच्या बाजारात आल्याशिवाय राहात नाही..
आयटी उद्योगपती कैलास बोयेतकर, राजकारणी विजय कुलकर्णी आणि सराफ व्यापारी अशोक कुलथे या तिघांचा व्यवसाय वेगवेगळा असला तरी हे तिघेही आपला नेहमीचं काम सोडून सोलापूरच्या आकलूजमध्ये आले होते .हे तिघेही इथं आले ते आपल्या अश्वप्रेमामुळे. अकलूजमध्ये दरवर्षी घोड्यांचा बाजार भरतो. यंदाही या बाजारात जवळपास दोन हजार घोडे विक्रीसाठी आले आहेत. घोड्यांचा बाजार म्हटलं की घोड्यांचे शौकिन तिथं येणारच. घोड्यांचा छंद एकदा जडला की तो सहजा सहजी सुटत नाही. बाजारात विक्रीसाठी आलेले रुबाबदार घोडे बघितल्यानंतर अश्वप्रेमींना त्याचा मोह टाळता येत नाही...

अकलूजच्या घोडे बाजारात विक्रीसाठी आलेल्या घोड्यांची संख्या आणि तिथं खरेदीदार पहाता आजही लोकांमध्ये घोड्यांविषयी प्रचंड आकर्षण असून त्यामुळेच कारपेक्षाही घोडा महाग असल्याचं पहायला मिळतंय...

घोडा आणि माणसाची सोबत तशी फार प्रचीन आहे.. त्यामुळेच आपल्या या लाडक्या प्रण्याची खदेरी करतांना अश्वप्रेमी बारकाईन पाहणी करतात... घोड्याची पारख असण हे पूर्वीच्या काळी मोठ अनुभवाच आणि मानाचं लक्षण समजलं जाई आणि आजही त्यात खंड नाहीच... घोड्याचे लक्षण पाहूनच तो खरेदी केला जातो...
घोडा हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतो एक अत्यंत देखणा आणि रुबाबदार प्राणी... हा प्राणी जेव्हा माणसाळला तेव्हापासून ते आजतागायत माणसाने त्याला अंतर दिलं नाही... काळ बदलला तरी घोड्याचं महत्व कायम राहिलं आहे...बाईक्स आणि कार्सच्या युगातही घोड्याची किंमत लाखाच्या घरात आहे..यावरुन घोड्याच महत्व आधोरिखीत होतंय...

आज जगभरात घोड्याच्या अनेक जाती असून मंगोलीया सारख्या देशात आजही अश्वसंकृती टिकून आहे. भारतातही घोड्याच्या विविध जाती आढळतात...सिंधी घोडा, मारवाडी घोडा, काठियावाडी घोडा, पंजाबी घोडा, भीमथडी घोडा....या घोड्यांच्या जाती महाराष्ट्रात आढळतात. पण त्य़ापैकी काहीच जातीच्या घोड्यांना