गुन्हेगारीत मुंबई, पुणे आघाडीवर

गेल्या काही दिवसात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. एका मागून एक घडणा-या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट हादरून गेलाय. गुन्हेगारीच्या बाबती महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याचं राज्याच्या गुन्हे २०१२च्या अहवालावरून दिसून येतं आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 23, 2013, 12:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही दिवसात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. एका मागून एक घडणा-या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट हादरून गेलाय. गुन्हेगारीच्या बाबती महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याचं राज्याच्या गुन्हे २०१२च्या अहवालावरून दिसून येतं आहे.
गुरुवारी महालक्ष्मी परिसरात एका मॅगझिनच्या फोटोग्राफरवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय तर नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर अनिल कदम या शिवसेना आमदारानं महिला कर्मचा-यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केलीय. पुण्यात अंनिसचे नरेंद्र दाभोळकर यांची निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. तर काही दिवसांपूर्वी मिशेल मार्क या परदेशी महिलेवर ब्लेडनं हल्ला झाला होता. गुन्हेगारीच्या या वाढत्या घटनांमुळं राज्यात चाललंय काय असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
गुन्हेगारीच्या बाबती महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याचं राज्याच्या गुन्हे २०१२च्या अहवालावरून दिसून येतंय. २०१२ साली संपूर्ण महाराष्ट्रात ३ लाख ३३ हजार ६८० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. २०११ची तुलना करता राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाणात१.१ टक्क्यांनी वाढ झालीये. एक नजर टाकूयात राज्यातल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवर.
विशेष म्हणजे सत्यपाल सिंह यांनी २३ ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला होता.. त्याला आज एक वर्ष पूर्ण होतोय. २०१२ साली महिलां संदर्भातील ७५३ गुन्हे घडले होते मत्र जानेवारी २०१३ ते जुलै २०१२या सात महिन्यांत मुंबईत महिलां संदर्भातील १७२३ गुन्हे घडलेत.
महिलांबाबत होणाऱ्या या अत्याचाराची आकडेवारी पाहाता गुन्हेगारांवर पोलीसांचा आजिबात वचक राहिलेला नाही हेच यातून निष्पन्न होतंय. त्यामुळे वर्षभरात पोलीस आयुक्तांनी केलं तरी काय हा प्रश्न उपस्थीत होतोय. राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चालंलयं. पुण्यात भररस्त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकारंची हत्या करणारे आरोपी अद्याप मोकाटच आहेत. त्यात काल संध्याकाली साडेसहाच्या सुमारास मुंबईत तरुणीवर झालेल्या सामूहीक बलात्काराच्या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. या बलात्काराविषयी माहिती घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा आर आर पाटल यांनी या बाबतीत बोलणं सोईस्कर रित्या टाळलं.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत दिवसाढवळ्या धावत्या ट्रेनमध्ये एका परदेशी महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच डॉ. नरेंद्र दाभोलकरांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. या घटनेला चार दिवसही होत नाहीत तोच मुंबईमध्ये एका तरुणीवर सामुदायीक बलात्काराची घटना घडलीये. दिवसा ढवळ्या होणारे खून बलात्काराच्या घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा सवाल सर्वसामान्यांना पडलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ