धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 10, 2014, 08:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..
विधानपरिषदेत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या मदतीवर चर्चा होती. त्याला उत्तर देताना पतंगराव कदम यांनी ही आकडेवारी जाहीर केली. 4 महिन्यात 559 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असतील तर दिवसाला जवळपास तीन शेतक-यांनी आपले प्राण दिलेत इतकी गंभीर ही आकडेवारी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.