मंदिर नावाचे मार्केट…

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, January 26, 2013 - 12:31

www.24taas.com, मुंबई
प्रत्येकाच्या मनात एक देव असतो.. श्रद्धाळूच्या मनातल्या देवाला एक नाव असतं.. त्य़ाचा आकार असतो.. आणि असलच तर त्याच मंदिरही असत.. तर जे कामावर विश्वास ठेवतात त्याचा फक्त काम हेच निराकार दैवत असत.. पण तत्वज्ञान कितीही सांगल तरी या क्षणाला समोरची आकडेवारी ही मंदिरातल्या देवाला आणि देवाच्या श्रीमंतीला ठसठसशीतपणे प्राधान्य देणारी आहे.. कधी काळी शांततेच स्थान असणारी मंदिर आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरखून गेलीय.. खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललय.. व्हीआयपी रांग आणि सोन्याचे नवस वरचढ होऊ लागलेत.. दानदक्षिणेमागे शुद्ध हेतू असतो.. पण त्याचा विनियोग शुद्ध हेतून होतो का याचच विचरमंथन करणारा आहे आजचा प्राईम वॉच ‘मंदिर नावाचे मार्केट…’

दिवसागणिक देशातल्या प्रत्येक मंदिरातली दानपेटीत दान वाढत जातंय. मंदिराच्या या दानपेट्यात श्रद्धेपोटी दिलं जाणारं दान वाढत चाललय. या साऱ्या गोष्टीला निमित्त एवढच की, शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी ३२ लाख रुपये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय आणि या बरोबरच साईंच्या सुवर्ण खजिन्यात आणखीनच वाढ झालीय. भारतात सुमारे १०० मंदिर अशी आहेत की ज्यांची वार्षिक दानाची रक्कम ही सरकारच्या एका योजनेच्या निधी एवढी असेल. या मंदिराच्या सांपत्तिक स्थितीवर नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल.

 पद्मनाभस्वामी मंदिर - एक लाख कोटीचा खजिना
 तिरुपती बालाजी - ५० हजार कोटीचा खजिना
 वैष्णो देवी - वार्षिक दान ५०० कोटी
 शिर्डी साईं संस्थान - वार्षिक दान २०० कोटी

प्रत्येकाचे श्रद्धेचे आयाम हे वेगवेगळे असतात. त्याची श्रद्धाही आपल्या दैवताप्रती निस्सीम असतात. पण भक्त आणि दैवत यांच्यामध्ये कोणीतरी आहे त्यावरच आपण या भागात बोलतोय. शिर्डीच्या एका साईभक्तानं साईंच्या चरणी एक किलो सोन्याचा एक कलश अर्पण केलाय. सोन्याचा या कलशाची किमत ३२ लाख एवढी आहे. दान देणाऱ्या या साईभक्तानं आपली ओळख गुप्त ठेवली असली तरी या निमित्तान दान-दक्षिणेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा सगळ्यांच लक्ष वेधलय.
सोन्य़ाचा हा कलश शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका भक्तानी अर्पण केलाय. अंदाजे एक किलो वजनाच्या या कलशाची किमत ३२ लाख रुपये एवढी आहे. साईबाबांवर निस्सीम विश्वास असणाऱ्या या भक्तानं साईंच्या आरतीवेळी हा कलश अर्पण केलाय. पण असं असल जरी तरी एवढ मोठी वस्तु अर्पण करणाऱ्या या भक्तानं आपलं नाव जाहीर करण टाळलंय. असं म्हटलं जातंय की हा भक्त दिल्लीचा रहिवासी आहे आणि आपली मनोकामना पूर्ण झाली म्हणून त्यानं ही नवसपूर्ती केलीय. ही पहिलीच वेळ नाहीय़ की ज्यावेळी शिर्डीच्या साई बाबांना अशी मौल्यवान भेट अर्पण झालीय. जगभरातल्या असंख्य भक्ताची श्रद्धा साईंच्या चरणी एवढी लीन आहे की म्हणूनच ते बाबांच्या चरणी सोन्याचांदीचे दागिने अर्पण करत आहेत. शिर्डीचे साई मंदिर हे देशातलं एक श्रीमंत मंदिर मानल जातं. साईंच्या चरणी येणारे भाविक वर्षाला सुमारे २०० कोटींची दान अर्पण करतात. शिर्डीच्या मंदिराचे व्यवस्थापन साई बाबा संस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात येतं. पण, जमा झालेला साईभक्तांचा पैसा योग्य वापरला जात नाही, अशी तक्रार साई भक्तच करत असतात. भक्तांचा हा आकडा दिवसेंगणिक वाढत चाललाय. जगभरातल्या श्रीमंत देवस्थानात ज्याची गणना होते त्या शिर्डीच्या साईमंदिरात भक्तही बाबांच्या चरणी यथाशक्ती दान देतात. सुरुवातीला पैशात असणार दान-दक्षिणा आता सोन्या-चांदीच्या वस्तूत दिसू लागलीय.
साल २०११-१२ मध्ये शिर्डी साई संस्थान ट्रस्टला २०६ कोटींचा फायदा झाला होता. गेल्या वर्षी शिर्डी साई संस्थान ट्रस्टच्या तिजोरीत २७३ कोटी रुपयांची भर पडली होती. ३१ मार्च २०१२ पर्यंत शिर्डी संस्थान ट्रस्टकडे ५० कोटी ५३ लाख रुपयांचे दागिने जमा असल्याची नोंद होती. साई भक्तांनी दिलेल्या दानामुळे विविध बँकांमध्ये ६३८ कोटींचं डिपॉझिट जमा झालंय. त्याचप्रमाणे ३२७ किलो सोनं आणि ३२०० किलो चांदीही जमा झालीय. साई भक्तांच्या या पैशाचा आणि सोन्या-नाण्याचा अधिकार ट्रस्टकडे आहे. ज्यावर आता राजकारण्यांचा शिरकाव झाल्याचा आरोप साईभक्त करत आहेत. त्याचप्रमाणं साईभक्तांच्या या दानाचा विनीयोग योग्य होत नसल्याची तक्रारही वारंवार करण्यात येतेय. अर्थात आक्षेप काहीही असले तरीही शेवटी सर्वाधिकार हे ट्रस्टकडे आहेत. त्याबरोबरच साईंच्या चरणी आलेला साईभक्ताचा पैसा हा साईभक्तांसाठी वापरावा, ही मागणीही काही वावगी नाहीय, हे मात्र नक्क

First Published: Friday, January 25, 2013 - 22:15
comments powered by Disqus