भेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला! Meet India`s Google Boy 6 years Kautilya

भेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला!

भेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

हरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जाईल.

या चिमुरड्याचं वय फक्त पाच वर्ष आठ महिने इतकं आहे. मात्र तुम्ही त्याला कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर तो लगेच देतो. कौटिल्यला जगातल्या अनेक देशांची माहिती अगदी तोंडपाठ आहे.

पहिल्या वर्गात शिकणारा कोटिल्य कोणतीही नदी, पहाड, राज्य, नामवंत व्यक्तींविषयी सहज माहिती देऊ शकतो. शिवाय कोणत्याही देशाविषयी विचारलं तर तो चटकन उत्तर देतो. कौटिल्यच्या या हुशारीनं त्याचं कुटुंबही हैराण आहे. त्याला खगोलशास्त्राविषयीही संपूर्ण माहिती आहे. कौटिल्यला मोठं होऊन खूप मोठं नाव कमवायचं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा या चिमुरड्याची बुद्धीमत्ता

First Published: Sunday, September 22, 2013, 12:57


comments powered by Disqus