रहस्य लादेनच्या मृत्यूचं!

लादेनला खातमा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती...पण त्यानंतर लादेनच्या मृत्यू विषयी एकही पुरावा अमेरिकेच्या सरकारने जारी केला नाही...अमेरिके लादेनच्या मृत्यू विषयी एवढी गोपनीयता का पाळतंय़ असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय..

जयवंत पाटील | Updated: Sep 11, 2012, 11:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
लादेनला खातमा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती...पण त्यानंतर लादेनच्या मृत्यू विषयी एकही पुरावा अमेरिकेच्या सरकारने जारी केला नाही...अमेरिके लादेनच्या मृत्यू विषयी एवढी गोपनीयता का पाळतंय़ असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय..
जगातील कुख्यात दहशतवादी ....ओसामा बिन लादेनचं काय झालं? असा प्रश्न बलाढ्य अमेरिकेला वारंवार विचारला जात आहे...मात्र अमेरिकेनं या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं असून लादेन एका कमांडो कारवाईत ठार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामान यांनी यापूर्वीचं सांगितलं आहे...

कमांडो कारवाईत ओसामा बिन लादेन ठार झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा यांनी सांगितलं खरं पण त्यानंतरही काही प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपती ओबामा यांनी लादेनला ठार केल्याचं जाहिर केलं...पण त्याचं साधा फोटोही अमेरिकेनं प्रसिद्ध केला नाही..त्यामुळे खरंच लादेन मारला गेला का ? असा सवाल आता केला जाऊ लागलाय..पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडो कारवाईत ठार झालेली व्यक्ती लादेन नसल्याचा दावा अबोटाबादच्या रहिवाशांनी केलाय..

लादेनच्या मृत्यूविषयी पुरावा देण्याची मागणी अमेरिकेच्या सरकारकडं अनेक वेळा करण्यात आलीय..पण प्रत्येक वेळी अमेरिकेनं पुरावा देण्यास नकार दिला..अमेरिकेनं लादेनला ठार केल्य़ाचा एकही ठोस पुरावा आजपर्यंत दिला नाही. लादेन बाबतीत अत्यंत गोपनीयता बाळगणा-या अमेरिकेचं हे दुसरं रुप पहा...९०च्या दशकात सद्दाम हुसैन अमेरिकेसाठी मोस्ट वॉन्टेड ठरला होता ...पण सद्दामला जेरबंद करतांना अमेरिकेच्या सैन्याने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या..तसेच त्याला फासावर लटकवतानाचं व्हिडीओ चित्रिकरणही सगळ्या जगानं बघीतलं...पण त्याला रोखण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केला नाही..
दशतवाद्यांना धडा शिकवण्याच्या नावाखाली अमेरिकेनं सद्दामला फासावर चढवतांना टिपलेला व्हिडीओ जगभर पोहचवण्याची व्यवस्था केली..पण लादेनच्या बाबतीत अमेरिकेनं मोठी गोपनीयता बाळगलीय.. अमेरिका लादेनच्या मृतदेहचे फोटो प्रसिद्ध का करत नाही ?तसेच त्या संदर्भातला पुरावा जगासमोर का मांडत नाही ?असा सवाल आता केला जात आहे..त्यामुळे लादेनचं काय झालं हा सवाल अद्यापही कायम आहे..
अमेरिका लादेनच्या मृत्यू विषयी सगळी माहिती जोपर्यंत उघड करत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होणं सहाजीकच आहे....पण आता अबोटाबादच्या कारवाईत सहभागी असलेल्या एका कमांडोने त्या रात्री काय घडलं याचा उलगडा आपल्या पुस्तकात केला आहे..लादेनच्या हवेलीत कमांडोजनी कशा पद्धतीने प्रवेश केला आणि त्यांनी लादेनचा खातमा कसा केला याची इत्यंभूत माहिती त्या पुस्तकात देण्यात आली आहे..

अमेरिकेनं ही कहाणी जगाला सांगितली होती..पण त्या कमांडो कारवाई नंतर निवृत्त झालेले नेव्ही सील कमांडो सिक्स टीमचे सदस्य मॅट बिसोनेट यांनी दिलेली माहिती मोठी धक्कादायक आहे...मॅट यांच्या मते त्या कमांडो कारवाईसाठी ४० नव्हे तर ६० मिनिटे लागली होती.. तसेच लादेनला दोन नव्हे तर तीन गोळ्या लागल्या होत्या..मॅट बिसोनेट यांनी हा गौप्यस्फोट `नो इझी डे` या आपल्या पुस्तकात केला आहे..अबोटाबादमध्ये केलेल्या कमांडो कारवाईची संपूर्ण हकीगत बिसोनेट यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे..हे पुस्तक त्यांनी मार्क ओवेन या नावाने लिहिलं आहे.. त्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार त्यारात्री नेव्ही सील कामांडो पथक अबोटाबादमधील लादेनच्या हवेलीत दाखल झालं होतं..त्या पथकात मार्कही सहभागी होते ...कमांडो हवेलीतील वरच्या खोलीच्या दिशेनं पुढ सरकत होते..मार्क पुढे एक पॉईंटमेन होता..लादेनच्या खोलीपासून ते पाच फूट अंतरावर असतानाच त्यांना गोळीचा आवाज ऐकू आला..पॉईंटमनला एक व्यक्ती खोलीबाहेर डोकावून पहात असल्याचं दिसलं...त्यावेळी केलेल्या गोळीबारात गोळी त्याला लागली की नाही हे मार्कला समजू शकलं नाही...पण ती व्यक्ती अंधा-या खोलीत गायब झाली..त्यानंतर पॉईंटमन त्या खोलीत पोहोचला ..जेव्हा मार्क खोलीत पोहोचले तेव्हा त्या खोलीत तीनजण होते.. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश होता..लादेन जवळ असलेल्या दोन महिलांपैकी एकीने कमांडोच्या दिशेनं येण्याचा प्रयत्न केला पण कमांडोने त्या दोघींना एकाबाजूला केलं...
मार्कच्या म्हणण्यानुसार ते जेव्हा लादेनच्या खोलीत पोहोचले तेव्हा लादेन शेवटच्या घ