OMG – ओह माय गोल्ड

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, November 27, 2012 - 21:14

www.24taas.com, मुंबई
येत्या काही महिन्यात तुमच्या घरी लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही..काहींच्या मते आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे..
होय...सोन्याचा भाव किती वर जाईल याची खात्री कोणीच देवू शकत नाही..सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीने ३१ हजार रुपयांचा आकडा पार केला होता..काहींच्या मते सोनं ३५ हजाराचा आकडा लवकरच पार करणार आहे...
आजच्या परिस्थितीत स्टॉक एक्स्चेंजच्या तुलनेत सोन्यातून चांगला लाभ होतोय..
- गेल्या दहा वर्षात सेन्सेक्समधून १९.३२% रिटर्न मिळाले तर सोन्याने २१.६८ % व्याजदराच्या हिशोबाने रिटर्न मिळाला
- तुम्ही २००२मध्ये शेअर्स आणि सोन्यात एक - एक हजार रुपये गुंतवले असते तर शेअर्समधून तुम्हाला ५८४९ रुपये मिळाले असते तर सोन्यातून ७११५ रुपये मिळाले असते

पण गुंतवणूक बाजारात भविष्याची कोणतीच खात्री घेता येत नाही..त्यामुळे सोन्याची ही चमकही धोका देवू शकते असं काहींच म्हणण आहे..
आज बाजारातील परिस्थिती पहाता गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं सर्वात वरच्या स्थानवर असल्याचं दिसून येईल..त्यामुळेच आगामी काळात सोनं आणखीच भाव खाणार यात कोणालाच शंका नाही..
................

दिवस सणासुदीचे आहेत.. तुम्ही सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करायचं ठरवलं असेल..तर थोडं थांबा...कारण सोनं खरेदी करतांना थोडी सावधानगिरी पाळणं महत्वाचं आहे..हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेची गॅरेंटी देते.. म्हणूनच प्रत्येक वेळी सोन्याची खऱेदी करताना हॉलमार्कचे दागिने खरेदी करण्यावर भर द्या...
लग्नसमारंभ आणि सणासुदीमुळे सध्या सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढलीय.....पण सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना सावधान.. कारण तुमची आयुष्यभराची कमाई पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..

सोनं खरेदी करताय ? फसवणूकीपासून सावधान !

जर तुम्ही केवळ सराफाच्या शब्दावर विश्वास ठेवून सोन्य़ाचे दागिने खरेदी करणार असाल तर सावधान..
सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतेवेळी पक्की पावती घ्या.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा..

शुद्धतेची निशाणी हॉलमार्कचे दागिने

हॉलमार्कची खूण ही सोन्याच्या शुद्धतेची गॅरंटी देते.. या निशाणीवरच तुम्ही तुमच्या सोन्याची पारख करु शकता..
24 कॅरेट सोनं हे शुद्ध मानलं जातं.. 24 कॅरेटला जर 1000 संख्या मानली तर 23 कॅरेटमध्ये 958 सोनं असेल.. हेच कारण आहे, की 23 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 958 असं लिहिलं जातं..याच आधारावर हॉलमार्कच्या दागिन्यांवर हॉलमार्कचा त्रिकोणी लोगो आणि संख्या लिहीलेली असते..

अंकावरुन ओळखा सोन्याची शुद्धता

हॉलमार्क दागिन्याच्या शुद्धतेवरुन त्याला अंक दिले जातात..
23 कॅरेट शुद्ध असणा-या सोन्याच्या दागिन्यावर 958 अशी संख्या लिहीली जाते. या प्रमाणेच 22 कॅरेट दागिन्यांवर 916 , 21 कॅरेट दागिन्यांवर 875, 18 कॅरेट दागिन्यांवर 750 , 17 कॅरेट दागिन्यांवर 708 अस लिहीण्यात येतं..
शुद्धतेची निशाणी हॉलमार्कचे दागिने
सोने खरेदी करणा-या ग्राहकांमध्ये हॉलमार्क संदर्भात आजून म्हणावी तेव्हडी जागरुकता आली नाही... शहरात हॉलमार्कच्या दागिन्यांची विक्री होत असते.. पण अजुनही ग्रामीण भागात शब्दावर विश्वास ठेवून दागिन्यांची खरेदी करतात.
देशभरात फक्त 9 हजार 300 सराफांकडेच गोल्ड हॉलमार्कची लायसन्स आहेत.. देशभरातील छोट्या दुकांनाचा विचार केला तर त्याची संख्या 17 लाखाच्या घरात आहेत.. याचाच अर्थ देशभरात जास्त ग्राहक हे आज शुद्धतेकडे लक्ष न देताच सोन्याच्या दागिन्याची खरेदी करतात..
................
जर तुम्ही गुंतणूकीच्या दृष्टीनं सोनं खरेदी करणार असाल तर गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंड हे पर्य़ाय चांगले आहेत..कारण ईटीएफमध्ये ना तुम्हाला दागिने घडवण्यासाठी मजूरी द्यावी लागते ना वॅट आणि अन्य टॅक्सचा भार तुमच्या खिशावर पडण्याची शक्य़ता असते..

ईटीएफच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करा

सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीचा आकडा ११ हजार कोटीच्या घरात गेला आहे..गेल्या वर्षी मे महिन्यात हाच आकडा ५००० कोटीच्या घरात गेला होता..य

First Published: Tuesday, November 27, 2012 - 21:11
comments powered by Disqus