दगाबाज रे.....

आता एक अशी कहाणी जी एखाद्या हिंदी चित्रपटाची सस्पेंस स्टोरीच वाटावी...एक हत्या होते आणि हत्येचा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात येतो...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 18, 2013, 08:14 PM IST

www.24taas.com, प्रेटोरिया
आता एक अशी कहाणी जी एखाद्या हिंदी चित्रपटाची सस्पेंस स्टोरीच वाटावी...एक हत्या होते आणि हत्येचा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात येतो...पण आता या सरळ वाटणा-या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसतायत...होय जगाला धक्का देणारी ही कथा आहे ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरिअस आणि त्याची गर्लफ्रेंड रिवा स्टीनकॅप्मची...
व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी व्हॅलेंटाईनचाच मर्डर...ब्लेड रनरने केली हत्या ?... आरोपी गजाआड...हत्यारही ताब्यात... रिवाचा खूनाची मिस्ट्री...
मिस्ट्री 1
आधी गोळ्या झाडल्या की क्रिकेटच्या बॅटनं मारलं ?
मिस्ट्री 2
हत्येपूर्वी प्रेमाच्या संदेशाचं रहस्य काय ?
1 मर्डर आणि 2 रहस्य

ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरिअसच्या घरी त्याची गर्लफ्रेंड रिवाचा खून झाला..ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरात फक्त दोनचं व्यक्ती होत्या. एक ऑस्कर आणि दुसरी त्याची गर्लफ्रेंड रिवा...रिवाची हत्या झाली आणि संशय ऑस्करवर गेला..रिवाच्या मृत्यूनंतर आता तिचा एक रेकॉर्डेड मेसेज समोर आलाय. आणि या एका मेसेजमुळे या खूनाचं रहस्य अधिकच वाढलय.....
जीवन सुंदर आहे...
जीवनाचा यथेच्छ आनंद लुटा...
जीवनाचा प्रवास कसा झाला हे महत्वाचं नाही...
महत्वाचं हे आहे की तुम्ही जगाचा निरोप कसा घेतला...

ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरयसची गर्लफ्रेंड रिवा हिचा हा शेवटचा मेसेज आहे... रिवाचं जीवन वॅलेंटाईन डेच्या रात्री गोळ्यांच्या आवाजात शांत झालं. रिवाचा खून तिच्याच बॉयफ्रेंडनं अर्थात ऑस्कर पिस्टोरिअसने केला...पण रिवाच्या या शेवटच्या मेसेजमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय...
ऑस्करची गर्लफ्रेंड रिवा स्टीनकॅम्प या रियालटी शोमध्ये पार्टिसिपेंट आहे. रिवाच्या मृत्यू नंतर अवघ्या दोन दिवसांतच या शोचा टेलिकास्ट करण्यात आलं... आणि आपल्या मृत्यूनंतरही हसणारी-खेळणारी रिवा पुन्हा एकदा संपूर्ण जगानं टीव्हीवर पाहिली...
या रिऍलटी शोमध्ये रिवानं एक मेसेजनं या मर्डर मिस्ट्रीचा गुंता जास्तच वाढलाय..रिवानं या शोमध्ये जगाला एक मेसेज दिला.....
काय आहे या मेसेज मागचा मेसेज?
या मेसेजमध्ये रिवानं आपल्या आयुष्याचं सार सांगितलं.. पण या मेसेजमध्ये काही वाक्यं अशी होती. ज्यांनी स्पष्ट होतय की रिवाला आपल्या बरोबर काहीतरी अघटित घडेल अशी शंका होती.
ऑस्कर पिस्टोरिअस रागिट स्वभावाचा आहे. रिवा बरोबर ब-याचदा त्याचं भांडणही झालं होत. रिवाला तिच्या बरोबर होणा-या या घटनेची पूर्व कल्पना होती का असा प्रश्न पडतो...रागिट स्वभावाचा ऑस्कर तिचा खून करणार हे रिवाला आधीच उमगलं होतं?
रिवाच्या या मेसेजमध्ये एक रहस्य दडलय. रिवाच्या या मेसेजमुळे अनेक प्रश्न उभे ठाकलेत...सुरुवातीला साधं सरळ वाटणारं हे प्रकरण जाणा-या प्रत्येक दिवसाबरोबर अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललय.
.........

कोण होती रिवा
रिवा स्टिनकॅम्पची ओळख फक्त ब्लेड रनर ऑस्करची गर्लफ्रेंडची एवढीच नाही...तर ऑस्करची गर्लफ्रेंड या पेक्षाही तिची स्वत:ची अशी वेगळी ओळख होती. मॉडेलिंगच्या जगात धमाल घडवलेली रिवा, जगातील सर्वात सुंदर स्त्रियांच्या यादीतही होती....
सोनेरी केस..मनमोहक डोळे...आणि कोणालाही प्रेमात पाडेल असं हास्य... कमालीचं सौंदर्य असलेली हि रिवा..रिवा स्टिनकॅम्प...रिवान एक प्रख्यात मॉडेल म्हणून जगात नाव कमावलं होतं..ती अधिकच चर्चेत तेव्हा आली जेव्हा तिच पॅरा-ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलेल्या ऑस्कर पिस्टोरिअसशी सूत जुळलं...रिवा आज आपल्यात नाही...ऑस्करवरच तिच्या खुनाचा आरोप आहे...नेहमीच हसताना दिसणारी रिवा खरी कशी होती हे फारच कमी लोकांना माहित आहे. रिवा नक्की कोण? तिचा स्वभाव कसा होता? माणूस म्हणून रिवा कशी होती..या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणंही तितकच गरजेचं आहे.
रिवा काही महिन्यांपूर्वीच ऑस्करच्या जवळ आली..आणि ही जवळीक कधी प्रेमात बददली हे कोणालाच कळलं नाही..रिवाच्या मनात ऑस्कर बद्दल प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमच होतं...ती नेहमीच ऑस्करचे गुणगाण गायची...एका प्रसिद्ध लाईफस्टाईल मॅगझिनसाठी तिनं मॉडलिंगही केलं होतं. सलग २ वर्ष ती जगभरातील सर्वात सुदंर 100 महिलांमध्ये होती...