पाकचा `कॅप्टन` !

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, May 9, 2013 - 23:44

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२१ वर्षांपूर्वी वर्ल्डकप जिंकून जो पाकिस्तान क्रिकेटचा तारणहार बनला तो जेव्हा मंचावरुन खाली कोसळून जखमी झाला तेव्हा पाकिस्तनात एकच खळबळ उडाली..पण तो जखमी झाल्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणाला खरंच कलाटणी मिळणार आहे का ?एकेकाळचा प्लेबॉय पाकिस्तानी जनतेचं नेतृत्व करणार का त्यावर एक नजर...
त्याने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा पाकिस्तान आनंदून गेला होता...आणि आता जेव्हा तो व्यासपीठावरुन खाली कोसळला तेव्हा अवघा पाकिस्तान हळहळला.. आज प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाच्या तोंडी एकच नाव आहे आणि ते म्हणजे इमरान खान याचं...
होय.. पाकिस्तानातील निवडणुकी आधी इमरान खान व्यासपिठावरुन खाली पडून जखमी झाला..टीव्हीवरुन सगळ्या जगाने ते दृश्य बघीतलं..आणि हीच घटना आता पाकिस्तानच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. निवडणुक प्रचारादरम्यान इमरान खान जखमी झाल्याचा त्याला निवडणुकीत फायदा होणार असल्याचं भाकीत राजकीय जानकारांनी केलंय....आज पाकिस्तानमध्ये इमरान खानसाठी सहानूभुतीची लाट निर्माण झालीय..
इमरान खानच्या प्रकृतीविषयी प्रत्येकाला चिंता आहे...पण जखमी अवस्थेतही इमरान खान चित्रफितीच्यामाध्यमातून मतदारांच्या संपर्कात आहे. पाकिस्तानात मतदान होणार आहे..पण दहशतवाद.भ्रष्टाचार...आणि दारिद्राचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे..अशात पाकिस्तानच्या नागरिकांच लक्ष्य या तीन चेह-यांकडं लागलं आहे. नवाज शरीफ, इम्रान खान, आसिफअली जरदारी. हे तिन्ही राजकारणी या निवडणुकीत आपलं नशिब आजमावीत आहेत...निवडणुक प्रचार शिगेला पोहचला असतांनाच इमरान खान जखमी झाला..त्यामुळे ११ मे रोजी लागणा-या निवडणुकीच्या निकालात इमरान खानचा दावा आणखी मजबूत झाल्याचं बोललं जातंय...
राजकारणाच्या खेळपट्टीवर या अपघातामुळे इमरान खानच्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा मिळेल का ? हाच खरा प्रश्न आहे..केवळ या एका घटनेमुळे पाकिस्तांनी नागरिकांना इमरान खानच्या पूर्वीच्या इमेज विसर पडले काय ? एकेकाळी प्लेबॉय म्हणून त्याची लोकांमध्ये इमेज होती..ऐकेकाळी त्याची प्रेमप्रकरणं चांगलीच गाजली होती ..त्याचे एका पंतप्रधानाशी अफेअर असल्याची कधी काळी चर्चा होती..एका बॉलीवूड अभिनेत्रीशी त्याचे घनिष्ठ संबंध होते...कधी काळी लंडनमधील तरुणी त्याच्यावर फिदा होत्या....ऐकेकाळचा प्ले बॉय आणि पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन आता पाकिस्तानचा कॅप्टन होईल का ? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल..
पाकिस्तानच्या राजकारणात १५ वर्ष घालवल्यानंतरही इम्रानखानच्या पाकिस्तान तहरीक - ए - इन्साफ या पक्षाला यश पहायला मिळालं नाही..पण गेल्या दोन वर्षात इम्रानच्या सभांना जी गर्दी होतेय ती पाहून पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्षांची झोप उडालीय..१९९६मध्ये एकाचवेळी तब्बल सहा मतदारसंघातून त्याने निवडणुक लढवली आणि सर्व ठिकाणी त्याचं डिपॉझिट जप्त झालं...पण असं असतानाही ते आज सत्तेचा दावेदार कसा बनला हे आता आपण पहाणार आहोत...
इमारान खान जेव्हा मंचावरुन खाली कोसळा तेव्हा त्याचं भाषण ऐकण्यासाठी हजारो पाकिस्तानी नागरिक तिथ उपस्थित होते..गेल्या दोन महिन्यांपासून इमरान खानने जवळपास ५० सभा घेतल्या आहेत..यावेळीही त्याचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक तिथं जमा झाले होते. इमरान खानच्या सभांसाठी लोक मोठी गर्दी करतायत...यापूर्वी बेनझीर भुट्टोच्या सभांना लोक अशी गर्दी करत...
पाकिस्तान आज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असून त्यांच्या समोर तीन पर्याय आहेत..त्यामध्ये इमरान खान हा एक आहे..पाकिस्तानी नगरिकांना आता परिवर्तन हवं आहे..
हा तोच इमरान खान आहे ज्याला १५ वर्षापूर्वी पाकिस्तानातील लोक प्लेबॉय म्हणून ओळखत होते..राजकारणाच्या खेळपट्टीवर बॅटिंग करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं..एकाचवेळी सहा मतदार संघातून निवडणुक लढवण्याचा प्रयोग त्याने केला होता मात्र सर्व ठिकाणी त्याला अपयश आलं..या पार्श्वभूमीवर राजकारणातला कॅप्टन होणार का असा सवाल केला जात आहे..
पण हे सगळं काही अचानक घडलं नाही..प्ले बॉयची इमेज असलेल्या इमरानने जेव्हा राजकारणाच्या पिचवर पाउल टाकलं तेव्हा त्याला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला..पाश्चमात्य पेहराव आपल्या राजकीय वाटचालीत अडथळा ठरु शकतो याची त्याला सुरुवातीलाच जाणीव झाली..आणि त्यामुळेच त्याने पेहराव बदलला...
बेकारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांची चांगलीच कोंडी झालीय..जनतेत अमेरिकेविषयी प्रचंड रोष आहे..कट्टरवादी विचारांचा जनतेवर प्रभाव आहे..त्यामुळेच त्

First Published: Thursday, May 9, 2013 - 23:44
comments powered by Disqus