पगाराला पीएफची कात्री

होय... तुमच्या पगाराला कात्री लागू लागण्याची शक्यता आहे..कारण आता तुमच्या पीएफची रक्कम केवळ बेसिक सॅलेरी ऐवजी विविध भत्यांचाही त्यामध्ये समावेश केला जाणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 13, 2012, 11:57 PM IST

होय... तुमच्या पगाराला कात्री लागू लागण्याची शक्यता आहे..कारण आता तुमच्या पीएफची रक्कम केवळ बेसिक सॅलेरी ऐवजी विविध भत्यांचाही त्यामध्ये समावेश केला जाणार आहे..जर असं झालं तर दरमहा पगारातून कापल्या जाणा-या पगाराच्या रकमेत वाढ होईल आणि पर्यायाने दरमहा तुमच्या हातात मिळणारी पगाराची रक्कम कमी होईल..
होय... देशातील पाच कोटी नोकरदार लोक आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे..एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात एपीएफओ संदर्भात नवीन नियम लागू करण्याची तयार करण्यात आलीय..
पगाराच्या मुळ रक्कमेत ( बेसिक सॅलेरी) सर्व भत्त्यांचा समावेश करुन त्यावर पीएफची रक्कम पगारातून वजा केली जाणार! विद्यमान नियमानुसार मुळ वेतनाच्या (बेसिक सॅलेरी ) रक्कमेवर पीएफ निश्चित केला जातो ! पीएफ निश्चित करतांना सर्व भत्यांचा समावेश केल्यास प्रत्येक्षात हातात पडणारी पगाराची रक्कम कमी होणार ! पण या नवीन नियमामुळे नोकरदारांची बचत होणार !
या नवीन नियमांचा पगारावर कोणता परिणाम होणार यावर आता एक नजर टाकू...

समजा एका व्यक्तिचा पगार ३८ हजार रुपये आहे
त्याचं मुळ वेतन ( बेसिक सॅलरी ) ३० हजार रुपये
कन्व्हेन्स अलाऊंस ५ हजार रुपये
नाईट शिफ्ट अलाऊंस ३ हजार रुपये आहे...त्यातून पीएफची रक्कम किती वजा केली जाते. आजच्या नियमानुसार मूळ वेतनाच्या रक्कमेवर पीएफची रक्कम निश्चित केली जाते...
जर एखाद्या व्यक्तीचं मुळ वेतन ( बेसिक सॅलरी ) ३० हजार रुपये असेल तर ७ हजार २०० रुपये पीएफ वजा केला जातो. पीएफची रक्कम निश्चित करतांना मुळ वेतनासोबतच अन्य भत्यांच्या रक्कमेचाही समावेश केल्यास काय होईल? त्यावर आता एक नजर टाकू या...

जर एका व्यक्तिचं मुळ वेतन ( बेसिक सॅलरी ) ३० हजार रुपये
त्यामध्ये दोन्ही भत्त्यांचा समावेश केला जाणार
वेतनाची रक्कम ३८ हजार होणार
त्यामुळे ९ हजार १२० रुपये पीएफची रक्कम वजा होणार

प्रत्यक्षात मिळणा-या वेतनावर कोणता परिणाम?
जर एखाद्या व्यक्तिचं मुळ वेतन ३० हजार रुपये असेल आणि

विद्यमान नियमानुसार ७ हजार २०० रुपये पीएफ वजा केला जात असेल तर नव्या नियमानुसार ९ हजार १२० रुपये पीएफची रक्कम म्हणून वजा केली जाणार.
जर पीएफच्या रक्कमेपैकी आर्धी रक्कम ही कंपनीकडून दिली जात असेल तर तुम्हाला प्रत्येक्षात मिळणारी रक्कम ९६० रुपयांनी कमी होईल..पण जर पीएफची संपूर्ण रक्कम कर्मचा-याच्या वेतनातून जात असेल तर प्रत्येक्षात मिळणारी पगाराची रक्कम १९२० रुपयांनी कमी होईल..

खरं तर यामुळे कर्मचा-याची बचत वाढणार आहे..तसेच दिर्घकाळानंतर कर्मचा-याच्या पीएफ अकाऊंटमध्ये मोठी रक्कम जमा होईल..

नवीन पीएफ नियमामुळे प्रत्येक्षात मिळणा-या पगाराची रक्कम कमी होणार असली तरी तसं काळजी करण्याचं कारण नाही...कारण आजची बचत निवृत्तीनंतर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन नियमावलीवर अमंलबजावणी करण्या आल्यास एक बाब निश्चित होईल ..आणि ती म्हणजे दरमहा तुमच्या पगाराची रक्कम कमी होईल..पण भविष्यासाठी तुमच्याकडं मोठी रक्कम जमा होईल..

पीएफ संदर्भातल्या या नवीन नियमानुसार काही प्रमाणात तोटा होणार आहे तर भविष्यकाळाचा विचार केल्यास हे नवीन नियम कर्मचा-याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत..
आजच्या परिस्थितीत पीएफच्या रक्कमेवर नजर टाकल्यास मुळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफ म्हणून वजा केला जाते. तर सरकारी कर्मचा-यांचा पीएफ हा मुळ वेतन आणि डीएच्या १२ टक्के इतका असतो. मात्र नवीन नियमानुसार मुळ वेतनामध्ये अन्य भत्त्यांचा समावेश करुन त्याच्या १२ टक्के पीएफ वजा केला जाणार आहे. भत्त्याचा अर्थ असे भत्ते जे कंपनी किंवा सरकारी विभागाकडून सगळ्या कर्मचा-यांना समान दिले जातात..पण नवीन नियमानुसार सर्व कर्मचा-यांना दिले जाणारे समान भत्ते पीएफच्या कक्षेत येणार.
काही भत्ते जे कंपनी किंवा सरकारी विभागाकडून काही ठरावीक कर्मचा-यांनाच दिले जातात..त्यामध्ये मोबाईल फोन, टेलिफोन, इंटरनेटचं बिलचा समावेश होते... अशा भत्त्यांचा पीएफच्या कक्षेत समावेश केला जाणार नाही...

पूर्वी कशा पद्धतीने तुमच्या पीएफची रक्कम निश्चित केली जात होती आणि आता नवीन पद्धतीने ती कशा पद्धतीने निश्चित केली जाईल यावर एक नजर टाकूया...ढोबळ मानाने एका कर्मचा-याच्या वेतनात मुळ वेतना