बुद्धगयेचं राजकारण

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, July 9, 2013 - 00:01

बिहारमधलं बुद्धगया मंदीर रविवारी साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय. पण हा इशारा देऊनही स्फोट का रोखता आले नाहीत हा प्रश्न कायम आहे.
बुद्धगया.. शांततेला लाभलेले अलौकिक अनुभूतीचं स्थान म्हणजे बुद्धगया.. पण हेच बुद्धगया साखळी स्फोटानं किचींत भयकंप झालय.. जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयाचं मंदिर रविवारी पहाटे साखळी स्फोटानं हादरुन गेलं. पहाटे साडेपाचच्या आसपास या मंदीराच्या परिसरात झालेल्या स्फोटानं सुरक्षा व्यवस्थेच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या. रविवारपर्यत असणारा स्फोटाचा आकडा सोमवारी दहा झालाय.. बुद्धगया इथं दहा साखळी स्फोट झाल्याची माहिती बिहारचे डीजीपी अभयानंद यांनी दिलीय... दहाव्या स्फोटाचा आज उलगडा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.. स्फोट घडवून आणण्यासाठी अमोनियम नायट्रेडचा वापर करण्यात आल्याचं बिहार पोलिसांचे म्हणणे आहे.
या स्फोटानंतर आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. बुद्धगया येथील स्फोटाचा इशारा गुप्तचर संघटनांनी यापूर्वीच दिला होता. बिहारमध्ये विदेशी दहशतवादी लपल्याची माहिती आयबीनं दोन आठवड्यापुर्वीच बिहार सरकार आणि बिहार पोलिसांना दिली होती. तसंच बुद्धगया मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा इशारा दिल्ली पोलीसांनीही यापुर्वी दिला होता. सुरक्षा यंत्रणेने दिलेले हे सर्व इशारे व्यर्थ ठरले. या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांची रविवारची प्रतिक्रिया सरकारी पठडीतलीच होती.
रविवारी घडलेल्या स्फोटानंतर आणि त्यानंतर देशभरातून झालेल्या टिकेनंतर सोमवारीही ठोस कारवाई दिसलीच नाही. सरकारी यंत्रणेची ही निष्क्रीयता म्हणायची की जराश्या गाफिलपणाचा दहशतवाद्यांनी उचलेला फायदा म्हणावा हा चिंतनीय प्रश्न आहे.. पण मु्द्दा कुठलाही असो राजकारण मात्र या विषयावरहुनही रंगले..विरोधकांनी या हल्ल्यानंतर जोरदार हल्लाबोल केलाय.
दहशतवाद्यांनी रविवारी सकाळी साडेपाच आणि पाच अठ्ठाव्वन ही वेळ साधत भगवान गौतम बुद्धांच्या ऐतिहासीक मंदिराला टार्गेट केलं. नऊ स्फोटातील चार स्फोट महाबोधी मंदिराच्या संकुलात झाले, तर तीन स्फोट या मंदिरातील तेरेगा विहाराजवळ झाले. पण यानिमित्तानं एक गोष्ट मात्र पुन्हा अधोरेखित झाली... या देशात आपण कुठल्याही ठिकाणी हल्ला करु शकतो हे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. स्फोटाचा इशारा दिला होता, या हल्ल्यातल्या दोषींची गय केली जाणार नाही आणि हा हल्ला म्हणजे सरकारी अपयश या सर्व पठडीतल्या उत्तरांची आज पुन्हा उजळणी झाली. पण या सर्व महाभारतानंतरही हे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा कधी निर्माण होणार याचं उत्तर कुणाकडेच नाहीय..

घटना कुठलीही घडो.. मग ती आपत्ती असो वा बॉम्बस्फोट, त्यावर उपाययोजना मदत पुनर्वसन नाही झाले तरी चालेल पण राजकारण मात्र व्हायलाच पाहिजे.. गेल्या काहि दिवसात प्रत्येक दुर्घटनेनंतर राजकारण होतच.. आणि यावेळी सुरुवात केलीय ती कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यानी...
बुद्धगयेतील स्फोटाच्या कानठळ्यातून सावरतो न सावरतो तोच आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यायत.. देशात कुठलाही घटना घडूदेत.. परिस्थीती कितीही गंभीर असो, त्यावर आरोप प्रत्यारोपावरुन खालच्या पातळीवर गेलंच पाहिज अस चित्र गेल्या काही वर्षात नेहमीच पहायला मिळतं.. प्रत्येक गोष्टीवर ट्विट करण्याची स्पर्धाच जणू या राजकारण्यांमध्ये पहायला मिळते.. आणि या सर्वात आघाडीवर असतात ते कॉंग्रेसचे प्रवक्ते दिग्वीजय सिंग.. प्रत्येक गोष्टीचे अपोझिशन कनेक्शन करुन मुद्दा राजकारणाच्या पातळीवर कसा वळवायचा याच कसब दिग्गीराजाकडे पुरेपुर आहे.. बुद्धगयेच्या स्फोटानंतरही त्यानी ट्विट केल आणि स्फोटांच राजकारण सुरु झाल..
मोदींच्या जवळचे अमित शहा अयोध्येत जाऊन राम मंदिराचा मुद्दा काढतात. मोदी आपल्या भाषणात नितीशकुमार यांना धडा शिकवण्याबाबत बोलतात. याच्या दुस-याच दिवशी बुद्धगयेत बॉम्बस्फोट होतात. या गोष्टीचा आपसात काही संबध आहे का ?
दिग्वीजय यांच्या या ट्विटनंतर स्फोटाचे राजकारण व्हायला सुरुवात झाली. कितीही टिका झाली तर दिग्वीजयांनी या मुद्यावरुन पुन्हा विरोधकावर टिकास्त्र सोडलय.. दिग्विजय कुठल्याही मुद्यावरुन मोदी आणि भाजपला टार्गेट करतात अशी तिखट प्रतिक्रीया भाजपच्या गोटातून येतेय. भाजपने या ट्विटवरुन दिग्वीजय सिंघावर प्रतिहल्ला चढवलाय..

स्फोटानंतरचे राजकारण केवळ आरोप प्रत्यारोपपुरत मर्यादित राहिल न

First Published: Tuesday, July 9, 2013 - 00:01
comments powered by Disqus