बॉलिवूडचे बॅड बॉईज....

बॉलीवुडचा स्टार.. नायक कि खलनायक.. अर्थात संजय दत्तला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलीय.. कायद्यापुढे सारे समान हा न्याय संजय दत्तला लागू होतोय.

Updated: Mar 23, 2013, 12:13 AM IST

www.24taas.com, मुंबई
बॉलीवुडचा स्टार.. नायक कि खलनायक.. अर्थात संजय दत्तला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलीय.. कायद्यापुढे सारे समान हा न्याय संजय दत्तला लागू होतोय.. पण संजय दत्तच्या शिक्षेनं बॉलीवुड हादरुन गेलय.. कारण संजय दत्त या नावावर ब़ॉलीवुडचे 100 कोटी गुंतलेयत.. पण चाहत्यांनी अमाप प्रेम देऊनही ब़ॉलिवुडची स्टार मंडळी बॅड बॉयज का बनतात हा प्रश्न सर्वानाच पडलाय
बॉलीवूडचा मुन्नाभाई संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय..तब्बल दोन दशकं हा खटला चालला..पण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावल्यानंतर केवळ संजय दत्तच नाही तर बॉलीवूडला जोरदार हादरा बसला..ज्या चित्रपट निर्मात्यांनी संजय दत्तला आपल्या आगामी सिनेमासाठी करारबद्ध केलं होतं, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.. संजय दत्तची शिक्षा कायम झाल्यामुळे त्याच्या आगामी सिनेमांच्या चित्रिकरणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय...संजू बाबाच्या सिनेमांवर निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत..२०१३चा विचार केल्यास संजय दत्तच्या नावावर जवळपास १० सिनेमे आहेत..सध्या संजय दत्त जंजीरचं शुटिंग करत आहे..
हा सिनेमा अमिताभ बच्चनच्या जंजीर सिनेमाचा रिमेक आहे..या रिमेकमध्ये संजय दत्त शेरखानच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्या सोबत दक्षिणचा स्टार रामचरण तेजा आणि प्रियंका चोप्रा हे रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत...जुन्या जंजीरमध्ये अभिनेता प्राण यांनी शेरखानची भूमिका साकारली होती..आता नव्या जंजीरमध्ये संजू बाबाचा लूक प्राण यांच्या प्रमाणेच असणार आहे..२०१३मध्ये संजय दत्तचा पुलिसगिरी नावाचा सिनेमा येवू घातला आहे..या सिनेमात तो पोलीस अधिका-याची भूमिका साकारतोय..अभिनेत्री प्राची देसाई संजू बाबाची हिरोईन असणार आहे..या दोन प्रमुख सिनेमांबरोबरच शेर, उंगली,जान की बाजी,मिस्टर फ्रॉड, आणि अलिबाग या सिनेमातही संजय दत्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे..या वर्षी हे सगळे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत..या शिवाय घनचक्कर मध्ये संजय दत्त सोबत विद्याबालन आणि इम्रान हाश्मी भूमिका साकारत आहेत..एव्हडंच नाही तर २०१४ आणि २०१५ या वर्षासाठी संजय दत्तच्या तारखांची जुळवा जुळव केली जात होती..तसेच त्याने काही चित्रपटांचं शुटिंगही सुरु केल होतं...त्यामध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या पी.के नावाच्या चित्रपटाचा समावेश आहे..मुन्नाभाई सिरीज मधील पुढचा सिनेमाही चर्चेत आहे..या सगळ्या चित्रपटांसाठी शंभर कोटींची गुंतवणुक करण्यात आलीय...पण आता संजय दत्त साकारत असलेल्या या चित्रपटांचं काय होणार असाच प्रश्न निर्मात्यांना पडला आहे...कारण बॉलीवूडच्या मुन्नाभाईला पुढचे साडेतीन वर्ष तुरुंगात घालवावी लागणार आहेत...

संजय दत्त प्रमाणेच संजयचा जीवलग मित्रही आता अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसतायत.. आणि हे नाव आहे, आघाडीचा स्टार सलमान खान यांच.. खरतर सलमान खान आणि वाद हे नेहमीच समिकरण दिसत.. हिट एण्ड रनप्रकरणी न्यायालयाच्या पाय-या चढणारा सलमान त्यानंतर काळवीट शिकार प्रकरणीही अडचणीत आलाय.. संजय दत्त पाठोपाठ आता सलमान खानच्या काळवीट प्रकरणाचा निकाल हा २५ मार्चला लागणार असल्याने बॉलीवूडच्या अडचणी वाढल्यायत..
स्टाईल भाई सलमान ...दबंग सलमान...फिटनेस गुरु सलमान..बॉक्सऑफिसचा युवराज सलमान..सुपरस्टार सलमान.. अशा कितीतरी नावानं सलमान ओळखला जातो....बॉलीवूडमधील या स्टारची प्रत्येक अदा हीट आहे..प्रसिद्धी माध्यमांचा लाडका आणि प्रेक्षकांचा प्रिय सलमान प्रत्येकवेळी असा काही कारनामा करतो ज्यामुळे बॅड बॉयची त्याची इमेज काही बदलत नाहीत..बॉलीवूडमधील लोक त्याला कॉ़न्ट्रोव्हर्सी चाईल्ड संबोधतात...कारण सलमान आज यशाच्या शिखरावर असला तरी कॉन्ट्रोव्हर्सी काही त्याच्या पिच्छा सोडत नाही...विशेष म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सीजच्या बाबतीतही सलमान हिट आहे...ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्यावेळी सलमान खानचं हे रुप सर्वांनीच बघीतलाय..या घटनेला भलेही बरीच वर्ष उलटून गेली असली तरी त्याचा परिणाम सलमान खानला आजही भोगावा लागतोय..मध्यरात्री फुटपाथवर गाढ झोपेत असलेल्या लोकांना सलमानच्या अलिशान कारने चिरडलं होतं..त्या घटनेमुळे सलामान खान चांगलाच अडचणीत सापडला होता...पण एव्हडी मोठी घटना घडूनही त्याच्या चाहत्यांनी त्याला जराही अंतर दिलं नाही..जोधपूरमध्ये शुटिंग सुरु असतांना काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान अडकला..त्याप्रकरणात त्याला तुरुंगात जावं लागलं असून अद्यापही ते प्रकरण सुरु आहे..पण असं असतांनाही बॉलीवूडच्या या बॅड ब़ॉयचा रुपेरी पडद्यावरचा जल