एक होता चित्ता

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, September 13, 2012 - 00:03

www.24taas.com, मुंबई
चित्त्याला या पृथ्वीतलावरचा सर्वात वेगवान प्राणी का म्हणतात...हे त्याचा वेग बघीतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल...कारण विजेच्या वेगापेक्षाही तो चपळ आहे आणि वा-यापेक्षाही तो वेगवान आहे. चित्ता भारतातून नामशेष होऊन अनेक वर्ष उलटलीत..पण आता पुन्हा एकदा त्याची पावलं या भूमीवर उमटणार आहेत..तशी तयारीच केंद्र सरकारने केली आहे..नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात आणले जाणार आहे...
भारतातून नामशेष झालेला चित्ता हा अत्यंत वेगवान प्राणी पुन्हा एकदा या भूमीवर परतणार आहे...त्याची डौलदार चाल पुन्हा एकदा भारतीय वन्यप्रेमींना पहायला मिळणार आहे...चित्ता शिकारीमागे ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने धावतो...त्याचा तो वेग थक्क करणारा असाच आहे...पृथ्वी तलावारचा अत्यंत वेगवान समजला जाणारा हा प्राणी भारतील काही निवडक अभय अरण्यात शिकार करतांना पहायला मिळणार आहे...चित्त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने सगळी तयारी केली असून गेल्या ४- ५ वर्षापासून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत...भारतात चित्त्याच्या पुनर्वसनासाठी नागपूरच्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन एन्ड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी पुढाकार घेतला आहे...आगामी ४ते ५महिन्यात चित्ते भारतात आणले जाणार आहे
नामिबिया आणि दक्षिण आफ्रेकेतून १८ चित्ते भारतात आणले जाणार आहेत..त्यामध्ये ९ नर आणि ९ मादी असण्याची शक्यता आहे...चित्याला भारतीय वातावरण नवं नसल्यामुळे तो भारतीय अभय अरण्यात रुळायला जास्त वेळ लागणार नसल्याचं डॉ. प्रज्ञा गिरडकर यांनी सांगितलंय.. चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसनासाठी सरकार जवळपास ५० लाख डॉलर्स खर्च करणार आहे...
चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी भारतातील मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांची निवड करण्यात आली आहे. कुणो-पालपूर ,नौरोदोही आणि शहागड या ठिकाणच्या जंगलात परदेशातून आणलेल्या चित्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे...
वन्यजीव अभ्यासकांच्या मते चित्यांसाठी गवताळ प्रदेश पोषक मानला जातो...त्यापार्श्वभूमीवर कुणो-पालपूर, नौरोदोही आणि शहागड या प्रदेशाची निवड करण्यात आली आहे..
वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने संशोधन करुन चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी या जागा निश्चित केल्या आहेत...तसेच आवश्यक तयारीही करण्यात आली आहे..त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती त्या १८ चित्त्यांची ....
चित्ते भारतात आणण्यासाठी सरकारने प्रक्रीया सुरु केलीय..त्यामुळे येत्या ४-५ महिन्यात चित्ते भारतात आणले जातील....पण त्यांच पुनर्वसन योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे..आफ्रिका आणि नामिबियातून आणलेले चित्ते थेट जंगलात सोडण्यात आल्यास ते पुन्हा नामशेष होण्याची भिती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली...
भारतात चित्यांच्या पुनर्वसानासाठी गेल्या ४- ५ वर्षांपासून सरकारने त्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केलीय.. ज्या देशांमध्ये चित्ते वास्तव्यास आहेत त्या देशांकडं चित्त्यांची मागणी केली होती...इराणमध्ये चित्ते असल्यामुळे त्यांच्याकडंही मागणी करण्यात आली होती मात्र इराणने चित्ते देण्यास नकार दिला होता..
इराणने नकार दिला असला तरी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेनं चित्ते देण्याची तयारी दर्शवली आहे...तसेच या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. चित्ते भारतात आणल्यानंतर त्यांना थेट जंगलात सोडणं जोखमीच होईल असं डॉ. प्रज्ञा यांना वाटतंय.
भारतात चित्त्याची संख्या वाढावी यासाठी काही बाबींचा विचार करण्याची आवश्यकता आहे....त्यामध्ये जैव प्रयोगशाळा उभारण्याची अत्य़ंत आवश्यकता आहे. योग्य पद्धतीने चित्यांचं पुनर्वसन केल्यासं पुढच्या काही काळात देशात त्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे...पण चित्ते आणल्यानंतर ते थेट जंगलात सोडल्यास हा प्राणी पुन्हा नामशेश होण्याची भीती व्यक्त केली जातेय.....या पार्श्वभूमीवर सरकारलाही गांभीर्याने विचार करावा लागणार आहे...
चित्ता पृथ्वीतलावरचा सर्वात वेगान प्राणी का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...त्याचं उत्तर त्याच्या शरीर रचनेत आहे..चित्त्याची शरीररचना विशिष्ट प्रकारची आहे..आणि त्यामुळेच तो ताशी १२० किलोमीटर वेगाने शिकारीचा पाठलाग करतो.
जेव्हा तो शिकारीचा पाठलाग करतो तेव्हा त्याला कॅमे-यात टिपणं अवघड होवून बसतं...कारण त्याच्या शरीराच्या हलचाली अत्यंत वेगवान असतात...चित्ता हा प्राणी सिंह, वाघ, बिबळ्या या प्राण्यांप्रमाणेच फेलिडो अर्थात मार्जारकुळातील असल्याचं काही वन्यजीव अभ्यासकांच म्हणनं आ

First Published: Thursday, September 13, 2012 - 00:03
comments powered by Disqus