वीरगाथा - NSG कमांडोंची वीरगाथा

26/11च्या रात्री दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांना टार्गेट केलं होतं..पण त्याचवेळी एनएसजी मुख्यलयात बसलेल्य़ा अधिका-याची अस्वस्थता वाढतच चालली होती.

Updated: Nov 27, 2012, 12:22 AM IST

www.24taas.com, मुंबई
26/11च्या रात्री दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांना टार्गेट केलं होतं..पण त्याचवेळी एनएसजी मुख्यलयात बसलेल्य़ा अधिका-याची अस्वस्थता वाढतच चालली होती..ज्या पद्धतीने हल्लेखोर हल्ला करत होते ते पहाता हा गँगवॉरचा प्रकार नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं..भारताच्या शत्रूंनी नियोजनबद्ध पद्धतीने तो हल्ला घडवून आणला होता.. आणि हीच बाब एनएसजीच्या तत्कालीन प्रमुखांनी ओळखली होती... मुंबईतील दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ते तयार होते..पण त्यांना सरकारकडून कोणताच आदेश देण्यात आला नव्हता...
त्यावेळी आपल्या टेलिव्हिजन स्क्रिनवर, मुंबई हल्ल्याची ही दृष्य पाहून एनएसजीचे तत्कालीन प्रमुख जे.के.दत्ता यांना अंदाज आला होता....तो हल्ला काही साधासूधा हल्ला नसल्याचं त्यांनी त्याचवेळी ताडलं होतं..

या हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी एनएसजीच्या जवानांची मदत नक्कीच घ्यावी लागणार यांची त्यांना खात्री पटली होती. हल्ला होऊन तास दोन तासांचा अवधी उलटून गेला तरीही मुंबई किवा दिल्लीहून कुणाचाही फोन दत्त यांना आला नाही.. अखेर दत्त यांना राहवलं नाही.. आणि त्यांनी अखेर रात्री 12 वाजून 35 मिनीटांनी महाराष्ट्राचे डीजीपी ए एन रॉय यांना कॉल केला आणि विचारणा केली की त्यांना एनएसजी कमांडोची मदत हवीय का.. रॉय यांच्याशी बातचित केल्यानंतर दत्त समजून चुकले की त्यांचा अंदाज अचूक होता..

रात्री 12 वाजून 20 मिनीटांनी गृह सचिवांनी दत्त यांना फोन केला. पण तो फोन येण्याअगोदरच 15 मिनीटांपुर्वीच दत्त यांनी एनएसजीच्या बहाद्दूर जवांनाना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.. प्रत्येक मिनीटागणीक हल्ल्याची तीव्रताही वाढत चालली होती. एनएसजीच्या कमांडोना जेवढं शक्य होईल तेवढं लवकर मुंबईला पोहोचणं आवश्यक होतं.. पण मुंबईला पोहोचण तेवढं सोप्प नव्हत.. दिल्ली विमानतळावर त्यांना नेण्यासाठी कुठलंही विमान हे त्यावेळी उपलब्ध नव्हतं.. एनएसजी कमांडोंना मुंबईला घेऊन जाणारं विमान चंदीगडहून आल्यानंतर मिळेल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं..एनएसजी प्रमुख दत्ता यांची बैचेनी मात्र क्षणाक्षणाला वाढत होती..त्यामुळेच दत्त यानी वायुसेनेच्या प्रमुखांना विमान उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. याच दरम्यान भारतीय गुप्तचर संघटना रॉकडून हवाई विभागामार्फत एनएसजी प्रमुखांना एक फोन आला... आय एम सेव्हन्टीन सिक्स हे विमान पालम विमानतळावर असून ते कमांडोसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचं सांगण्यात आलं...आणि मग त्याच विमानाने न 27 नोव्हेंबरला सकाळी पाच वाजता एनएसजीचे जवान मुंबईकडं रवाना झाले..

रात्रभर दहशतवाद्याचा हल्ला सहन करत मुंबईची सकाळ उजाडली. ती याच आशेने की अंधकार संपून सार काही आलबेल होईल.. सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी एनएसजीची पहिली टिम मुकाबल्यासाठी सज्ज झाली होती.. पण जवांनासाठी हे आव्हान सहजसाध्य नक्कीच नव्हत.. त्यांचा सामना प्रशिक्षित दहशतवाद्यांशी होता....
27 नोव्हेंबरच्या सकाळी एनएसजी कमांडोचं पथक मुंबईत दाखल झालं...त्यांना ना दहशतवाद्यांच्या संखेचा अंदाज होता ना त्यांच्याकडं असलेल्या शस्त्रसाठ्याची काही माहिती होती...पण त्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी कमांडोंनी एक रणनिती तयार केली... आणि सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी हॉटेल ऑबेरॉयमध्ये कमांडोंच्या एका पथकाने दहशतवाद्यांवर हल्ला चढवला..

जशास तसं उत्तर देण्यासाठी एनएसजी कमांडो तयार झाले होते..मेजर भरतसिंग यांच्या नेतृत्वाखाली २५ कमांडोजची एक टीम ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेलात शिरली...तर लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली दुसरी टीम त्यांच्या पाठोपाठ कव्हर फायर देत पुढे पुढे सरकत होती...ट्रायडेंट हॉटेलच्या या संपूर्ण ऑपरेशनची जबाबदारी पी.एस.राठी यांच्याकडं होती..एनएसजीची टीम फायर एक्झिट मार्गाने २१ व्या मजल्यावर पोहोचली..हॉटेलात शिरलेल्या दहशतवाद्यांची संख्या किती आहे याचा अंदाज एनएसजी कमांडोजना सुरुवातीला येत नव्हता...

हॉटेलच्या २१ मजल्यावर एनएसजी कमांडोंनी दहशतवाद्यांना शोधण्यास सुरुवात केली..शेवटी २८व्या मजल्यावर पहिल्यांदाच एनएसजी कमांडोचा सामना दहशतवाद्यांशी झाला...या मजल्यावरच्या खोली नंबर १८५६मधून दहशतवादी सतत गोळीबार करत होते...त्यानंतर एनएसजी कमांडोंनी दहशतवाद्यांना थेट आव्हान दिलं...

खोली नंबर १८५६मधून सतत गोळीबार होत असतांनाही या ऑपरेशनचं नेतृत्व करणारे पी.एस राठी यांनी त्या खोली शेजारीच असलेल्या एका खोलीतून तात्पुर्ता नियंत्रण कक्ष तयार केला होता..त्या खोलीतून ते आपल्या कमांडोजना सूच