राधे माँचं `माया`जाल

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, March 7, 2013 - 07:22

www.24taas.com, मुंबई
आध्यात्मिक क्षेत्रात राधे माँ हे एक मोठं नावं आहे..राधे माँचे भक्तगण देशभर पसरले आहेत..नुकतेच राधेमाँच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं...तो सोहळा बघीतल्यानंतर हा देवीचा जागर आहे का एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम असा प्रश्न प़डल्याशिवाय राहात नाही..
हे दृश्य बघीतल्यानंतर इथं एखादा मोठा इव्हेंट सुरु असावा असं कुणालाही वाटेल...
आध्यात्मिक गुरु राधे माँच्या वाढदिवसा निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन नुकतेच मुंबईत करण्यात आलं होत...पुन्हा एकदा पहा आकाशातून अवतरणा-या राधे माँचा हा अनोखा अंदाज...
आध्यात्माच्या नावाखाली भक्त लाखो रुपयांचा चुराडा करतात...राधे माँचे भक्त याला देवीचा जागर म्हणतात..मंचावर शंकर आणि दुर्गा देवीची भव्य मुर्ती उभारली होती....पण जेव्हा राधे माँची एन्ट्री झाली तेव्हा तिच्या समोर सगळं काही खुजं ठरलं..तिथ असलेला प्रत्येकजण केवळ राधे माँची एक झलक पहाण्यासाठी उत्सुक होता..सगळा परिसर राधे माँच्या नावाने दुमदुमून जातो...
राधे माँ नव्या जमान्याची आध्यात्मिक गुरु आहे..गर्दी कशी जमा करायची याची तिला चांगलीच जाण आहे..त्यामुळे प्रत्येक वेळी नवनव्या क्लृप्त्यांचा वापर केला जातोय...राधे माँचा प्रत्येक कार्यक्रम भव्यदिव्य असतो...त्यासाठी पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो...श्रीमंत भक्तांची फौज असल्यामुळेचं हे सगळं काही शक्य होतंय..
साधू संतांनी मोह,मायावर विजय मिळवलेला असतो... तथाकथिक आध्य़ात्मिक गुरु राधे माँ म्हणजे आध्य़ात्माचा नवा अवतार आहे..आध्यत्म आणि लक्ष्मीचा संगम जर पहायचा असेल तर राधे माँच्या दर्शनला जा...कारण या राधे माँचा थाटमाट काही वेगळाच आहे..आणि तो थाट पाहूनचं तिचे श्रीमंच भक्त सढळ हाताने लाखो रुपयांची दक्षीणा दानपेटीत टाकतात..आपल्या भक्तांना आशिर्वाद देण्य़ाची राधे माँची पद्धतही निराळीच आहे..भक्त राधे माँला फूल अर्पण करतात आणि राधे माँ त्या फुलांवर मंत्रोच्चराची फुंकर घालून फुलांच्या पाकळ्या राधे माँ भक्तांना परत करते..राधे माँच्या नावाने जागर आय़ोजीत केला जातो..भक्तांकडून लाखो रुपयांची दक्षीणा दिली जाते.. लाखो रुपये किंमतीची अलिशान जग्वार कार एका भक्ताने राधे माँला भेट म्हणून दिलीय..राधे माँ विद्यमान तथाकथित धर्मगुरुंपैकी लक्झरी क्लास संत मानली जाते....आपल्या निवडक भक्तांसोबत नृत्य करायलाही ती मागेपुढे पहात नाही..नृत्य करतांना अचानकपणे ती विचित्र मुद्रा करते..आणि ती मुद्रा बघूनच तिच्या भक्त दंडवत घालतात..तसेच राधे माँसाठी आपला खिसा मोकळ करतात..राधे माँचा शृंगार तर काही विचारुच नका...राधे माँची एक झलकपासून तिचे भक्त अक्षरशा वेडेपिसे होतात..तिचा अशीर्वाद घेण्यासाठी लोक व्याकुळ असतात..हा सगळा प्रकार बघीतल्यानंतर आध्यात्माच्या नावाखाली हा वेगळाच उद्योग सुरु असल्याचं कुणाच्याही लक्षात येईल..
राधे माँचा थाटमाट आताच आपण बघीतलाय....पण ही राधे माँ आहे तरी कोण ? कुंभ मेळ्यात जाण्याचाय निर्णय़ राधे माँने का टाळला हे आता आपण पहाणार आहोत....

राधे माँच्या वाढदिवसा निमित्त या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं...राधे माँचा आशिर्वाद घेण्यासाठी हजारो भक्त तिथ जमले होते..तिच्या भक्तांची संख्या फार मोठी आहे....त्यामध्येही श्रीमंतवर्गाचा भरणा अधिक आहे..दोन दिवस हा सोहळा चालला..मुंबईतील बोरीवली परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं..देशभरातून भक्तगण इथ जमा झाले होते..आपल्य अनोख्या कारनाम्यामुळे राधे माँ नेहमीच चर्चेत राहिली आहे..राधे माँ एक आध्यात्मिक गुरु आहे..तिच्या भक्तांमध्ये सेलिब्रिटिंचाही समावेश आहे...त्यामुळे राधे माँचा महिमा देशभर पसरला आहे...भक्तांची संख्या मोठी असल्यामुळे दक्षीणेच्या रुपाने मोठी रक्कम दानपेटीत जमा होते.. लाखो भक्तांच्या बळावर राधे माँने महामंडलेश्वर पदवी मिळविण्याचा प्रयत्न केला..पण जूना आखाड्यातील संतांमध्ये एकमत न झाल्यामुळे ती पदवी तिला मिळाली नाही..प्रयागमधील कुंभ मेळ्याला जाण्यावरुनही राधे माँ वादात सापडली होती..त्यामुळेच तिने कुंभला न जाण्याचा निर्णय घेतला..राधे माँ नव्या युगातील आध्य़ात्मिक गुरु आहे...गर्दी कशी जमवायची याची तिला चांगलीच जाण आहे..त्यामुळेच प्रत्येक वेळी नव नव्या क्लृप्त्या वापरल्या जातात...तिचा सतसंगही एखाद्या इव्हेंट पेक्षा कमी नसतो..

First Published: Thursday, March 7, 2013 - 00:11
comments powered by Disqus