सरणाच्या लाकडांची होळी; पालिकेच्या प्रतिमेचा प्रश्न!

‘महापालिकेतर्फे अंत्यविधीसाठी मोफत लाकडं उपलब्ध करून दिली जातात आणि अशा प्रकारे या अंत्यविधीसाठीच्या लाकडांमध्येही भ्रष्टाचार होत असेल तर संबंधितांवर नक्कीच कारवाई केली जाईल’ असं आश्वासन स्थायी समितीचे सभापती राहुल शेवाळे यांनी दिलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 26, 2013, 09:03 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘महापालिकेतर्फे अंत्यविधीसाठी मोफत लाकडं उपलब्ध करून दिली जातात आणि अशा प्रकारे या अंत्यविधीसाठीच्या लाकडांमध्येही भ्रष्टाचार होत असेल तर संबंधितांवर नक्कीच कारवाई केली जाईल’ असं आश्वासन स्थायी समितीचे सभापती राहुल शेवाळे यांनी दिलंय.

खुलेआम हा प्रकार चालतो. महत्त्वाचं म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर असूनही प्रशासनाला याबाबत कुठलीच खबर लागत नाही. याबद्दल जाब विचारला असता ‘ही अंत्यसंस्कार विधीसाठीच आहेत. कर्मचारी किंवा कंत्राटदार अशा पद्धतीनं अंत्यसंस्काराची मोफत लाकडं होळीसाठी विकत असतील तर ते बेकायदेशीरच आहे... तसंच हा महानगरपालिकेच्या प्रतिमेचा प्रश्न आहे... याबाबत लवकरच आयुक्तांना सूचना देण्यात येतील’ असं राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.
ही बाब उघड केल्याबद्दल आणि सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल राहुल शेवाळे यांनी ‘झी २४ तास’चं अभिनंदन केलं.