रक्षक की भक्षक ?

आज गृहनिर्माण सोसायटीत राहणा-यांची संख्या वेगाने वाढतेय ...पण तिथंल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेकडं गांभिर्यानं बघीतलं जात नाही...गेल्या अनेक प्रकरणातून ते उघ़ड झालं आहे ..आणि त्यामुळेच सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षितता धोक्यात आलीय...सोसायटीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या सेक्युरिटी गार्डवर असते त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं..आणि त्यामुळेच आपण खरंच सुरक्षित आहोत का, असा प्रश्न आता रहिवाशांना पडल्याशिवाय राहत नाही...खासगी सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या सुरक्षेवरच आहे.. प्रश्न आहे तो..रक्षक की भक्षक ?

सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2012, 04:05 PM IST

www.24taas.com,मुंबई
आज गृहनिर्माण सोसायटीत राहणा-यांची संख्या वेगाने वाढतेय ...पण तिथंल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेकडं गांभिर्यानं बघीतलं जात नाही...गेल्या अनेक प्रकरणातून ते उघ़ड झालं आहे ..आणि त्यामुळेच सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षितता धोक्यात आलीय...सोसायटीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या सेक्युरिटी गार्डवर असते त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं..आणि त्यामुळेच आपण खरंच सुरक्षित आहोत का, असा प्रश्न आता रहिवाशांना पडल्याशिवाय राहत नाही...खासगी सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या सुरक्षेवरच आहे.. प्रश्न आहे तो..रक्षक की भक्षक ?
सोसायटीतील रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सेक्युरिटी गार्डवर असते....पण गेल्या आठवड्यात मुंबईतील वडाळ्यात जी घटना घडलीय ती पहाता रक्षकचं भक्ष्यक बनल्याचं पाहायला मिळालंय.

मुंबईच्या वडाळ्यातील याच हिमालय हाईट्स इमारतीत ती भयंकर घटना गेल्या आठवड्यात घडली होती.

तारीख : 9 ऑगस्ट 2012
वेळ : पrहाटे 4.30 वा.

हिमालय हाईट्सच्या १६व्या मजल्यावर २५ वर्ष वयाची पल्लवी पुरकायस्त रक्ताने अक्षरश: न्हाऊन निघाली होती. मदतीसाठी तिने १६व्या मजल्यावरच्या प्रत्येक फ्लॅटची बेल वाजवली होती...पण दुर्दैवाने तिच्यासाठी एकानेही दरवाजा उघडला नाही...पल्लवी बाहेर शेवटच्या घटका मोजत होती आणि शेजारी मात्र गाढ झोपले होते..कोणीच मदतीला येत नसल्याचं पाहून शेवटी पल्लवी आपल्या फ्लॅटमध्ये परतली...आणि त्यानंतर तिने शेवटचा श्वास घेतला. पहाटे पल्लवीच्या खूनाची खबर तिच्या मित्रामार्फत पोलिसांपर्यंत पोहोचली.

पल्लवीचे वडील दिल्लीत आयएएस अधिकारी असून पल्लवी मुंबईत वकीली करत होती..तसेच एका फिल्म प्रॉ़डक्शन कंपनीसाठी ती विधी सल्लागर म्हणूनही काम पहात होती..गेल्या दोन वर्षांपासून पल्लवी अलोक सेनगुप्ता या मित्रासोबत या फ्लॅटमध्ये राहात होती....धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून पल्लवीचा खून करण्यात आला होता. ज्या पद्धतीने तिचा खून करण्यात आला होता ते पहाता एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने हे कृत्य केलं असावं असा पोलिसांना संशय होता..कारण पल्लवीच्या फ्लॅटमधून एकही वस्तू चोरीला गेली नव्हती...पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा त्यांची शंका खरी ठरली. पल्लवीचा घात एका ओळखीच्या व्यक्तीनेच केला होता.

पल्लवीच्या खूनाचा तपास पोलीस करत होते..आरोपी कोण असावा याचा त्यांना अंदाजही आला होता..ओळखीच्या व्यक्तीने ते निर्दयी कृत्य केलं असावं असा संशय होता आणि त्यांचा तो संशय खरा ठरला...सोसायटीच्या सेक्युरिटी गार्डनेच पल्लवीचा घात केला होता. पल्लवीचा खून तिच्या ओळखीच्या व्यक्तीनेच केला असावा असा संशय पोलिसांनी आला होता...कारण चोरीच्या उद्देशातून खून झाला असता तर फ्लॅटमधील मौल्यवान सामानाची चोरी झाली असती...पण पोलिसांनी तसं काहीच आढळून आलं नव्हतं..त्यामुळे पोलिसांनी ओळखीच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केलं होतं...पल्लवीचा मीत्र अलोकचीही चौकशी केली होती..पण संशयाची सूई सोसायटीचा सेक्युरिटी गार्ड सज्जाद अहमद मंसूर याच्याकडं वळली...कारण घटनेनंतर तो गायब होता....पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आणि पल्लवीच्या खूनाचं रहस्य उलगडलं...पल्लवीने काही दिवसांपूर्वी आपला अपमान केल्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी आपण तिचा खून केल्याची कबुली सज्जादने दिली...पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या घटनेने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे..
गेल्या तीन वर्षांपासून सज्जाद हिमालयन हाईट्समध्ये कामाला होता..पण सोसायटीने त्याची माहिती ना पोलीसांना दिली होती ना पोलिसांकडून त्याच्या विषयी माहिती मिळवली होती...आरोपी सज्जादने आपलं आडणाव तसेच काश्मीरमधील आपला पत्ताही चूकीचा दिला होता.
ज्या इमारतीत पल्लवीचा खून झाला त्या इमारतीतील एका फ्लॅटची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे..पल्लवी आपल्या फ्लॅटचं ५५ हजार रुपये भाडं देत होती...ही इमारत अलिशान असली तरी या सोसायटीत असलेल्या चार सीसीटीव्ही कॅमे-यापैकी एकही कॅमेरा सूरू नव्हता..तसेच इमारतीततील इंटर कॉमही बंद होता...ही सगळी परिस्थिती पहाता ज्यावेळी पल्लवीचा खून करण्यात आला त्यावेळी सोसायटीतील सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचं आढळून आलं...जर सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असते तर आरोपीचं कृत्य कॅमे-यात कैद झालं असतं....सोसायटीच्या सुरक्षेकडं दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात हे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
सेक्युरिटी गार्ड नेमतांना काही गोष्टींची काळजी घेतली असती तर मुंबईतील वडाळ्याची घटना टाळता आली