टायटॅनिकचा पुनर्जन्म

By Jaywant Patil | Last Updated: Friday, March 1, 2013 - 23:39

www.24taas.com, मुंबई
शंभर वर्षापूर्वी टायटॅनिक का बुडालं ? नेमकी कुठं चूक झाली?कोणत्या गोष्टीची काळजी घेतली असती तर टायटॅनि्क वाचवता आलं असतं?तसेच टायटॅनिक - २ समोर कोणती आव्हानं आहेत? हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पुन्हा भेटण्याची त्यांना खात्री होती पण हा आपला शेवटाचा प्रवास ठरेल याची त्यांना जराही कल्पना नव्हती. जगातील सर्वात आलिशान जहाजाने तीन तासात १५ एप्रिलच्या पहाटे याच ठिकाणी जलसमाधी घेतली. पण खरचं ती दुर्घटना रोखता आली असती का हाच खरा प्रश्न आहे...कदाचित ते शक्य होतं...टायटॅनिकच्या बांधणीचं काम १९०६मध्ये सुरु झालं..त्यानंतर तीन वर्षांनी टायटॅनिकची बांधणी पूर्ण झाली...पण त्याची बांधणी करतांना काही बाबतीच निष्काळजीपणा झाल्याचं बोललं जातंय..टायटॅनिकवर संशोधन करणा-यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहत..त्यांच्या म्हणण्यानुसार टायटॅनिक विषयी अनेक दावे करण्यात आले होते..कधीच बुडू न शकणारं जहाज हा त्यापैकीच एक दावा होता..पण टायटॅनिक तयार करतांना मजबुतीकडं लक्ष दिलं गेलं नाही..टायटॅनिकला बुडण्यापासून वाचवता आलं असतं असं आता संशोधनाअंती पुढं आलं आहे..टायटॅनिकमध्ये दोन स्टेअरिंग व्हील होते..धडकेनंतर एक व्हील डावीकडं फिरलं असतं तर जहाज बर्फाच्या त्या मोठ्या तुकड्यापासून दूर गेलं असतं.. पण गडबडीत ते व्हिल विरुद्ध दिशेनं फिरवलं गेलं..आणि त्यामुळे जहाज त्या बर्फाच्या भल्यामोठ्या तुकड्या लगत गेलं...संशोधकांच्या मते जहाजाच्या कॅप्टनने टायटॅनिक योग्य दिशेनं नेहण्याचा प्रयत्न केला..पण तो पर्यंत फार उशिर झाला होता..धडक झाल्यानंतर टायटॅनिक त्याच ठिकाणी थांबवलं असतं तर त्यामध्ये वेगाने पाणी शिरलं नसतं..टायटॅनिकच्या बांधणीत ज्या वस्तूंचा वापर केला गेला होता त्या विषयी संशोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत..ती दुर्घटना घडली त्यावेळी टायटॅनिकचा वेग नेहमीपेक्षा खूपच जास्त होता..आणि त्यामुळेच समोर बर्फाचा कडा दिसल्यानंतरही जहाजाची दिशा बदलं शक्य झालं नाही..पण टायटॅनिक - २ मध्ये या समस्या उद्भवू नयेत साठी विशेष प्रणाली तयार करण्यात आलीय..अत्याधुनिक नेव्हिगेशन प्रणाली बसवण्यात आलीय..तसेच विशिष्ट पद्धतीचा धातू जहाजाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलाय..
२ची बांधणी केली जात असली तरी शंभरवर्षापूर्वीच्या टायटॅनिकचं बात काही औरचं होतं..त्याकाळचं ते अतिशय भव्य़दिव्य आणि अलिशान असं जहाज होतं..टायटॅनिकच्या लक्झरी क्लासचं तिकीट किती होतं? टायटॅनिकच्या अधू-या प्रवासातील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती होती? आणि ते जहाज कस बुडालं ? ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत...
हिमनगामुळे टायटॅनिक तुटून समुद्राच्या तळाशी गेले.. टायटॅनिकची दृष्य पाहिल्यावर वाटतं की ते जहाज नव्हतं, तर एक शहर होतं.. जगभरातील सगळी सुख-सुविधा एकवटल्याचं हे असीम दृष्य पाहिल्यानंतर कधीकाळी ते तुटून नष्ट होईल याची कुणी कल्पनाही केली नसेल. १० एप्रिल १९१२ ला टायटॅनिक न्युयॉ़र्ककडे २२२३ प्रवाशांना घेऊन रवाना झाले होते.. सारं काही आलबेल असं चाललं होतं. जहाजावर उपस्थित असणा-या प्रत्येकासाठी तो प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. पुढचे तीन दिवसही रम्य असेच होते. टायटॅनिकवर ते सर्व काही होतं जे केवळ कल्पनेत रंगवलं जायचं... स्विमींगपूल, जीम, स्क्वॅश कोर्ट, महागड फर्नीचर, आलिशान एक्सेसीरीज, जनरेटर, लिफ्ट, रेडिओ, लायब्ररी, बार्बर श़ॉप, प्रत्येक सुविधा या जहाजावर होती.. सुमारे १०० वर्षापुर्वीही त्याच तिकीट ८०० पाऊंड होतं याचा अर्थ आजच्या काळात ४३ लाख रुपये होते. आलीशान शब्द ही या वैभवापुढे फिका पडावं एवढ सारं भव्यदिव्य होतं. पण अवघ्या काही क्षणात हे सारं काही नष्ट झालंय..१४ एप्रिल १९१२ ला रात्री ११ वाजून ४० मिनीटांनी अटलांटिक महासागरात ती भीषण दुर्दैवी घटना घडली. ही टक्कर समुद्रात तरंगत असलेल्या भव्य हिमनगात आणि टायटॅनिक जहाजात झाली होती.. या धडकेनंतर टायटॅनिकच्या एका भागातून पाणी येवू लागलं.. आणि विषासारखं हळूहळू टायटॅनिकच्या एका एका भागात पाणी घुसू लागलं.. सगळी कडे हलकल्लोळ माजला.. मदतीची याचना सुरु झाली पण त्या विशाल समुद्रात टायटॅनिक एकटं होतं.. मदतीला वेळी कुणीच आलं नाही आणि टायटॅनिकचे दोन तुकडे झाले.. जहाजावर लाईफ बोट फार कमी होत्या.. आणि त्यामुळे फार मोठं नुकसान झालं.. लाईफ बोटच्या सहाय्यानं महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न झाला.. पण पुरुष प्रवाशांना आपले प्राण गमावावं लागले.. २२२३ लोकांसाठी केवळ २० लाईफ बोट होत्या.. महिला आणि मुलांसाठी अनेक पुरुषांनी आपली कुर्बानी दिली. शिकस्त करत ७०६ लोकांना वाचवण्यात आलं.

First Published: Friday, March 1, 2013 - 23:39
comments powered by Disqus