मृत्यूचं तूफान...

By Surendra Gangan | Last Updated: Monday, October 29, 2012 - 21:15

www.24taas.com, न्यूयॉर्क

जागतीक महासत्ता म्हणून मिरवणा-या अमेरिकेचं धाबं दणाणलेत...सगळ्या जगाला धाकात ठेवणारी अमेरिका घाबरलीय ती सँडी नावाच्या वादळाला...हे आस्मीनी संकट अमेरिकेच्या पूर्व भागात येवून थडकलं असून त्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवलीय जातेय..सँडी हे गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं वादळ ठरण्याची शक्यता आहे.११०० किमीपेक्षा जास्त परिसरातला याचा तडाखा बसणार आहे...एव्हड्या मोठ्या संकटाचा अमेरिका कसा सामना करणार हा प्रश्न अवघ्या जगाला पडला आहे. काय आहे हे मृत्यूचं तूफान...
सँडी वादळ अमेरिकेच्या किनारपट्टीवर येवून थडकलं आहे..त्यामुळे अमेरिकेतल्या नागरिकांची अक्षरश: झोप उडालीय...सँडीला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं वादळ का म्हटलं गेलंय. ढगांनी चोहोबाजूंनी वेढलेली पृथ्वी... अंतराळातून दिसणारं हे पृथ्वीचं रुप पाहून अवघ जग हादरुन गेलंय...जगतीक महासत्ता समजल्या जाणा-या अमेरिकेवरच हे महासंकट ओढावलंय.
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि मिट रोमनी यांनी व्हर्जिनियाचा प्रचार दौरा रद्द केला आहे..कोलराडोमध्ये सोमवारचा प्रचार दौरा त्यांनी रद्द केलाय. अमेरिकेत गेल्या सात दशकात आलेलेल्या वादळांपैकी हे वादळ सर्वात भयंकर आहे.

खरं तरं अमेरिकेत सुरू होती राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीची धामधूम... ओबामा की रोम्नी या प्रश्नाच उत्तर काहीच दिवसात मिळणार होतं... मात्र अचानक एक नैसर्गिक संकट अमेरिकेवर ऊभ ठाकलयं... आत्तापर्यंत शंभराहून अधिक जणांचे बळी घेणारं सँण्डी वादळ अमेरिकेवर घोंगावतयं... त्यामुळे अमेरिकेतल्या न्यूयॉर्कसह अनेक मोठ्या शहरांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं.
कॅरेबियन आयलँड आणि हैतीमध्ये सँडी वादळाने मृत्यूचं तांडव घातलं असून तिथली परिस्थिती पाहून सगळ्यांची धास्ती वाढली होती...पण पुढे हे वादळ असं काही अकराविकराळ रुप घेईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.सँडी वादळचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार नाही असं सुरुवातील वाटलं होतं..तसेच ते लवकरच शांत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता..पण आता या वादळाने जे रुप धारण केलंय ते पहाता जगातील सर्वात भय़ंकर वादळ ठरण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या ज्या भागाला या वादळाचा फटका बसणार आहे त्या परिसरात लोकसंख्या अधिक आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार वेगवान वारा आणि महाकाय आकाराच्या या वादळाचा फटका बोस्टन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलेडेल्फिया या शहरांना बसणार आहे. हवामान खात्याकडून सतत माहिती दिली जात असून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..या कारणामुळेच अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं वादळ म्हटलं जातं आहे. या वादळाची ही दृष्य पोटात गोळा आणणारी आहेत.

जिथं -जिथं सँडीने पाऊल टाकलंय तिथ-तिथ मोठ्या प्रमाणात मणुष्यहानी तसेच मालमत्तेचं नुकसान झालंय..आता हेच विनाशकारी वादळ अमेरिकेसाठी धोकादायक बनलंय....हवामान खातं आणि अमेरिकेचं गृहसंरक्षण दलाला या धोक्याची पुरेपूर कल्पना आहे..मात्र अमेरिकेत जो सर्कतेचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय..या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला जात आहे..
अमेरिकेत धोक्याचा इशारा दिला गेलाय. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा घरात साठा करुन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे..वादळा दरम्यान हवेचा वेग लक्षात घेता लोकांना स्थलांतरीत केलं गेलंय..एकट्या न्यूयॉर्क शहरातून ३७ हजार नागरिकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आलं आहे..पण पुढच्या काळात वादळाचा वेग आणखीनच वाढल्यास त्यामुळे अमेरिकेचा धोका वाढण्याची शक्यता वर्तली जातेय... अंतराळातून या वादळावर लक्ष्य ठेवून असलेल्या तज्ज्ञांच्या मते सँडी जेट स्ट्रीमला धडकल्यास त्याच आकार आणि वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर ही टक्कर झाल्यास विनाश अटळ आहे.

न्यूयॉर्कमध्ये रेल्वे,बस, सब-वे राहणार बंद राहणार आहेत. अमेरिकेच्या नौदलाने यूएसएस हॅरी समवेत आपल्या सर्व युद्ध नौका सँडी वदळापासून शेकडो मैल लांब नेवून उभ्या केल्या आहेत..याच कारणामुळे ग्वाँटेमालच्या समुद्र परिसरात राहणा-या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलंय.

First Published: Monday, October 29, 2012 - 21:01
comments powered by Disqus