शौर्यगाथा... भारतीय हवाई दलाची

भारतीय हवाईल दलाने ८१व्यात वर्षात पदार्पण केलं असलं तरी खऱ्या अर्थाने याचा इतिहास त्यापेक्षाही जूना आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती. पण त्यावेळी त्याचं नाव काही वेगळचं होतं. बांग्लादेशच्या युद्धात भारतीय हवाई दलाने आपली ताकद पाकिस्तानला दाखवून दिली होती.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2012, 09:08 AM IST

www.24taas.com, मुंबई
जेव्हा जेव्हा शत्रूने भारताकडं वाकडी नजर करुन पाहण्याची हिंमत केलीय तेव्हा तेव्हा भारतीय हवाई दलाने त्याला चोख उत्तर दिलंय...समोर शत्रू कोणीही असतो त्याला सडेतोड उत्तर देण्यात भारतीय हवाई दलाच कधीच कमी पडलं नाही... शत्रूचा कोणताही हल्ला परतवून लावण्याची ताकद या भारतीय हवाई दलात आहे
भारतीय हवाई दल....
वायू वेगाने गगनभेदी आवाज करत जेव्हा भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान आकाशत झेपावतं तेव्हा शस्त्रूची भांबेरी उडाल्याशिवाय राहात नाही. शत्रू कितीही शक्तीशाली असला तरी त्याला धूळ चारण्याची ताकत भारतीय हवाई दलात आहे. कितीही बाकाप्रसंग असला तरी त्यावर मात करण्याची क्षमता भारतीय हवाई दलात आहे. आणि हा आजवरचा इतिहास आहे. जगातील सर्वात मोठ्या हवाई दलांपैकी एक अशी भारतीय हवाई दलाची ख्याती आहे.
पावणे दोन लाख जवान आणि साडे तेराशे लढाऊ विमान तसेच हेलिकॉप्टर या बळावरचं भारतीय हवाई दलाने जगातील पहिल्या चार हवाई दलांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. ज्या -ज्या वेळेस शत्रू देशांनी भारताची सीमा ओलांडण्याचं धाडस केलं त्या-त्यावेळी भारतीय हवाई दलाने चोख उत्तर दिलं आहे.जेव्हा जेव्हा युद्धचा प्रसंग उभा राहिला तेव्हा तेव्हा भारतीय हवाई दलाने महत्वाची भूमिका बजावली आहे. `नभ: स्पृशं दीप्तम्` हे ब्रीद भारतीय हवाई दलाने सार्थ ठरवलं आहे. आज भारतीय हवाई दलने जगभर आपला दबदबा निर्माण केला आहे.
भारतीय हवाईल दलाने ८१व्यात वर्षात पदार्पण केलं असलं तरी ख-या अर्थाने याचा इतिहास त्यापेक्षाही जूना आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय हवाई दलाची स्थापना करण्यात आली होती. पण त्यावेळी त्याचं नाव काही वेगळचं होतं. बांग्लादेशच्या युद्धात भारतीय हवाई दलाने आपली ताकद पाकिस्तानला दाखवून दिली होती. पण ती काही पहिलीच वेळ नव्हती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेचच पाकिस्ताने जम्मू कश्मीरच्या निमित्ताने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला खरा. पण तेव्हाही भारतीय हवाई दलाने आपल्या परंपरेला शोभेल अशी कामगिरी केली होती.
भारत स्वातंत्र झाला खरा पण त्याच बरोबर देशाची फाळणीही झाली. भारत आणि पाकिस्तान अशा दोन स्वतंत्र देशांची निर्मीती झाली. भौगोलिक विभजनासोबतच तत्कालीन रॉयल इंडिनय एअर फोर्सचंही विभाजन झालं. दहा पैकी तीन स्क्वॉड्रन आणि कार्यालयं जी पाकिस्तानात होती ती फाळणीनंतर रॉयल पाकिस्तान एअर फोर्समध्ये सहभागी झाले. याच दरम्यान पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जम्मू काश्मीरच्या राजांने जम्मू काश्मीर भारतात सहभागी करुन घेण्याचं मान्य करत भारताकडं सैन्य मदत मागितली..त्यांनी दस्तावेजावर सही करताच भारतीय हवाई दलाची विमाने हवेत झेपावली आणि जम्मू काश्मीर परिसरात भारतीय सैन्य दाखल झालं. या युद्धात भारतीय सैन्याला मोठी मदत हवाई दलाकडून मिळाली. खरं तर या युद्धाची औपचारीक घोषणा झाली नव्हती. पण भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडलं होतं. भारतीय पाय़दळाला रसद पुरण्याचं काम तसेच हवाई संरक्षण देण्याच काम भारतीय हवाई दलाने केलं होतं.

१९६१मध्ये पुर्तुगिजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्याच्या मोहिमेत भारतीय हवाई दलाने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी ऑपरेशन विजयची आखणी करण्यात आली होती. ८ ते १८ डिसेंबर या दरम्यान हवाई दलाने फायटर्स विमानांचा वापर केला होता. भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पोर्तुगिजांना गोवा सोडून पळ काढावा लागला होता. त्या युद्धात ‘हंटर’ विमानांचाही वापर करण्यात आला होता. तसेच ‘व्हॅम्पायर’ विमानांनी पाय़दळाला रसद पुरवली होती..स्वातंत्र्यानंतर जम्मू काश्मीर असो की गोवा मुक्ती भारतीय हवाई दलाने प्रत्येकवेळी आपलं शत्रूला खडे चारले आहेत.
बांग्लादेश युध्दातही भारतीय हवाई दलाने महत्वाची भूमिका बजावलीय.. १९७१मध्ये भारताचं पाकिस्तानशी युद्ध झालं..२२ नोव्हेंबरला युद्धाची ठिणगी प़डण्यापूर्वी १० दिवस आधी ४ पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय सीमीलगत हल्ला केला. पण भारतीय लढाऊ विमानांनी त्यांन चोख उत्तर दिलं..त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे पाकिस्तानचा भुगोल कायमचाच बदलून गेला.
स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दलाने प्रत्येक वेळी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे..अत्याधुनिक सैन्य सामग्री नसतांनाही 1971 युद्धात भारतीय हवाई दलाने अतुलनिय कामगिरी ब