शेतकऱ्यांसाठी `स्मार्ट कार्ड`

By Jaywant Patil | Last Updated: Monday, September 3, 2012 - 08:10

www.24taas.com, पणजी
गोवा सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे इथल्या शेतकऱ्यांना सबसिडी आणि कर्ज वितरण करण्यास सोयीचं ठरणार आहे. तसेच सरकार दरबारी माराव्या लागणार चकराही आता कमी होणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत केलंय.
गोवा सरकारच्या वतीने आता शेतक-यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डमुळे इथल्या शेतक-यांना सबसिडी आणि कर्ज वितरण करण्यास सोयीचं ठरणार आहे. या योजनेमुळे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर कसणा-या ६५ हजार शेतक-यांना लाभ होणार आहे. या योजनेमुळे शासकीय कामकाजात सुटसुटीतपण आणंनही शक्य होणार आहे. पर्यटनामुळे शेतीपासून दूर गेलेल्या शेतक-यांना पुन्हा शेतीकडे वळवण्यासाठीही योजना आखण्यात आली आहे. या स्मार्ट कार्डमध्ये शेतक-यांच्या माहितीची नोंद ठेवली जाणार असून यामुळे शेतक-यांना कर्ज आणि सबसिडी देण्यास नेमकेपणा येणार आहे.या योजनेसाठी शेतक-यांचा मोठा प्रतीसाद मिळतोय.

गोवा सरकारने राज्यातल्या शेतक-यांसाठी भात, नारळ,तेलताड काजू यांतच्या आधारभूत किंमती याआधीच जाहीर करुन शेतक-यांचा विश्वास संपादन केला आहे. आपल्या राज्यात मात्र सुस्त प्रशासनाला शेतक-यांच्या प्रश्नां दुय्यम वागणूक मिळते. त्यामुळे नेहमीच उदासीन असणा-या सरकारला अशी योजना राबवण्याचं शहाणपण कधी येणार याचीच वाट पहावी लागणार आहे.

First Published: Monday, September 3, 2012 - 08:10
comments powered by Disqus