धुम्रपान कराल तर अविवाहित राहाल!

सिगारेटमुळे तुमचं आयुर्मान कमी होतं. तुम्हाला गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. तसेच सिगारेटमुळे तुम्हाला आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची वेळ येऊ शकते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 1, 2013, 08:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तुम्ही अद्याप अविवाहित आहात आणि तुम्हाला सिगारेट पिण्याचं व्यसन आहे… तर हे तुमच्यासाठी घातक आहे. कारण सिगारेट तुमची वैरी आहे..सिगारेटमुळे तुमचं आयुर्मान कमी होतं. तुम्हाला गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. तसेच सिगारेटमुळे तुम्हाला आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची वेळ येऊ शकते.
धुरांच्या वलयात आरोग्याची चिंता विसरुन यामुळे तरुणी प्रभावित होतील, असा जर तुमचा समज असले तर पुन्हा एकदा विचार करा. सिगरेटमुळे तुम्हाला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे, असं नाही तर तुम्हाला आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची वेळ येऊ शकते. दिल्लीत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार इथल्या तरुणींना धुम्रपान करणाऱ्यांशी विवाह करण्यास थेट नकार दिलाय.

दिल्लीतील २६ टक्के मुलींनी धुम्रपान करणाऱ्या तरुणांशी लग्नाला नकार दिलाय. हा सर्वे १६ शाळेत करण्यात आला होता. यात १९५ मुलींचं मत जाणून घेतलं गेलं. दहावीत शिकणाऱ्या या मुलींच्या म्हणण्यानुसार धुम्रपान करण्याला स्टाईल स्टेटमेंट मानने अत्यंच चुकीचे आहे. २६ टक्के मुली पॅसिव्ह स्मोकिंगचा सामना करत आहेत. ८० टक्के मुलींनी धुम्रपान नकरण्याचा सल्ला कुटुंबातील व्यक्तीला दिला आहे. २० टक्के मुलींनी भीतीपोटी तक्रार केली नाही.

दिल्लीतील तरुणी धुम्रपान करणाऱ्यांमुळे त्रस्त आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांना विरोध करण्याची मानसिक तयारी त्यांनी केलीय. धुम्रपान करणाऱ्यांनी धुम्रपान सोडून द्यावं असं ५८ टक्के मुलींच मत आहे. धुम्रपान घातक असल्याचं ८६ टक्के मुलींनी सांगितलंय. आपल्या जीवनसाथीनं धुम्रपान सोडावं यासाठी रोज त्याला विनवनी करण्याची तयारी ९५ टक्के मुलींनी दर्शवलीय. पण धुम्रपानाची सवय जडलेले व्यसन सोडण्यास सहजासहजी तयार होत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.