सोनेरी मायाजाल

नोकरीच्या नावाखाली वेश्याव्यवसायात ढकलण्याचे एक असं षडयंत्र आहे ज्याचा खुलासा झाल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मायाजाल मुंबईत विणण्यात आलं होतं..आणि त्याचा मार्ग होता मुबंई ते दिल्ली आणि दिल्ली ते दुबई. पोलिसांनी आपल्या षडयंत्राची खबर लागू नये म्हणून दिल्लीचा मार्ग अवलंबला होता..पण त्यांचा तो डाव पोलिसांनी हाणून पाडला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2012, 10:46 PM IST

www.24taas.com,मुंबई

त्या ३६ तरुणींचा आक्रोश
जो घेईल तुमच्या काळजाचा ठाव
तो एक अत्यंत भयंकर अपराध आहे
जो तुमच्या अंगावार शहारे आणल्याशिवाय रहाणार नाही
थंड डोक्याने ते षडयंत्र रचण्यात आलं होतं
त्या तरुणींना मोठी स्वप्न दाखविण्यात आली होती
पैशाचं आमिष दाखवण्यात आलं होतं
पण त्या कामाविषयी त्यांना जराही कल्पना नव्हती
त्यांचा विश्वासघात करण्यात आला होता
तो प्रकार अंगाचा थरकाप उडणारा असाच होता

नोकरीच्या नावाखाली वेश्याव्यवसायात ढकलण्याचे एक असं षडयंत्र आहे ज्याचा खुलासा झाल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.. त्या षडयंत्रात एकीकडं मुंबई आहे तर दुसरीकडं दुबई.. होय ...त्यांच्या तावडीतून देशातील एकही शहर सुटलं नाही..ठिकठिकाणी त्यांचे एजन्ट आहे...पण जेव्हा एखाद प्रकरण उघडकीस येतं तेव्हा सगळ्या देशाचं लक्ष त्याकडं जातं..त्याच षडयंत्राचा पर्दाफाश करणार आहोत आजच्या प्राईमवॉचमध्ये... सोनेरी मायाजाल
ज्या सोनेरी मायाजालाचा पर्दाफाश करणार आहोत ...ते मायाजाल मुंबईत विणण्यात आलं होतं..आणि त्याचा मार्ग होता मुबंई ते दिल्ली आणि दिल्ली ते दुबई. पोलिसांनी आपल्या षडयंत्राची खबर लागू नये म्हणून दिल्लीचा मार्ग अवलंबला होता..पण त्यांचा तो डाव पोलिसांनी हाणून पाडला.
हे दृष्य एका हिंदी सिनेमातलं असलं तरी अशीच एक घटना वास्तवात घडलीय... होय....असंच काहीसं दृष्य तिथं होतं. एका टोळीच्या तावडीतून कशा पद्धतीने ३६ तरुणींची सूटका करण्यात आली हे तुम्ही प्रथमच पहाणार आहात.

मुंबईतील विमानतळ . तरुणींनी आपले चेहरे झाकले आहेत....खरं तर त्यांनी कोणताच गुन्हा केला नाही...पण जगदुनियेपासून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत...आणि म्हणूनच त्यांनी चेहरा झाकलाय....प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमे-यापासून चेहरा लपविण्याचा प्रयत्न त्यांनी का केला असावा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल....पण त्याचं उत्तर ऐकूण तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही...या तरुणींना दिल्ली विमान तळावरून ताब्यात घेण्यात आलंय... कारण त्यांना दुबईला पाठविण्यात येणार होतं....पण त्यांचा तो डाव तडीस जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांची सूटका केलीय....पोलिसांनी वेळीच ही कारवाई केली नसती तर मोठा अनर्थ झाला असता..

मुंबईतील काही तरुणींना दिल्ली मार्गे दुबईला पाठविण्यात येणार असल्याची खबर मुंबईतील समाजसेवा शाखेला मिळाली होती...मानवी तस्करी करणा-या एका टोळीचं या सगळ्या घटनेमागे कारस्थान होतं... समाजसेवा शाखेनं माहितीची खातरजमा केल्यानंतर त्या टोळीचा डाव हाणून पाडण्यासाठी तयारी केली होती..समाज सेवा शाखेला आपला प्लॅन कळाल्याचं मानवी तस्करी करणा-या टोळीला समजलं होतं...त्यामुळे ते सावध झाले होते...त्यांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नवीन योजना आखली...तो मार्ग मुंबईवरुन दिल्ली आणि दिल्लीतून दुबई असा निश्चित केला होता..समाजसेवा शाखाला संशय येवू नये म्हणून त्या टोळीने दिल्ली मार्गे दुबईला जाण्याचा बेत निश्चित केला होता....
ठरलेल्या योजनेनुसार दलालांनी २४ तरुणींना मुंबईहून दिल्लीला रवाना केलं होतं....तसेच राजस्थान,मध्यप्रदेश आणि पश्चिमबंगालमधून उरलेल्या १२ तरुणींना दिल्लीत आणण्यात आलं होतं....त्या ३६ तरुणी दिल्लीच्या इंदिरागांधी विमानतळावर एकत्र आल्या होत्या..पण त्यांच्याकडं ना पासपोर्ट होता ना व्हिजा.

दिल्ली विमानतळावर पुढं काय झाल ? आणि कशी सुटका झाली त्या ३६ तरुणींची ? हे आम्ही तुम्हा दाखविणार आहोत मात्र त्यापूर्वी एक गोष्ट पहाणं महत्वाचं आहे आणि ती म्हणजे त्या तरुणींना दलालांनी कशा पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढलं ते. ऑर्केस्ट्रा आणि छोट्या मोठ्या सिनेमात काम मिळवून देण्याचं आश्वासन या तरुणींना देण्यात आलं होतं..९० दिवसांच्या दुबई टूर नंतरप्रत्येकीला दिड ते दोन लाख रुपये देण्यात येणार होते....तीन महिन्यात दिड ते दोन लाख रुपये मिळणार असल्यामुळे त्या तरुणी खूश होत्या...पण ती टुर त्यांच्यासाठी नरकाची सफर ठरणार होती आणि त्याची त्या तरुणींना जराही कल्पना नव्हती.

परदेशात चांगलं काम आणि चांगला पैसाही मिळणार या आशेवर त्या तरुणी दिल्लीच्या इंदिरागांधी विमानतळावर आल्या होत