अब तक ४८!

By Jaywant Patil | Last Updated: Friday, May 24, 2013 - 00:02

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विदर्भ,खानदेश आणि मराठवाड्यात उष्णतेनं कहर केला आहे...सतत वर झेपावणारा पारा नवनवे उच्चांक गाठत आहे..त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही-लाही होत आहे..आकाशातून सूर्य जणू आग ओकतोय असंच चित्र सध्या विदर्भात पहायला मिळतंय...चंद्रपूरमधील तापमानाने तर नवा विक्रम केला आहे.. भविष्यात राज्यातील सर्वात उष्ण शहर म्हणून चंद्रपूरची गणना होणार आहे.. बुधवारी चंद्रपूरचं तापमान हे ४८.२ अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलं होतं..
चंद्रपूर
-----
४८.२ अंश सेल्सियस

अमरावतीचं तापमानही जवळपास तेव्हडंच होतं

अमरावती
---------
४८ अंश सेल्सियस

विदर्भातील बाकीच्या जिल्ह्यातील तापमानही ४५ अंश सेल्सियसच्या वर जाऊन पोहोचलंय...बुधवारी नागपूरातील तापमानाने साठ वर्षापूर्वीचा उच्चंक मोडलाय...२६ मे १९५४ रोजी नागपूरात ४७.८ इतकं तापमान होतं... बुधवारी नागपूरमध्ये ४७.९ अंश सेल्सियस एव्हड तापमान नोंदवण्यात आलं...गेल्या साठ वर्षातील हे सर्वाधिक तापमान मानलं जातंय.. नागपूरप्रमाणेच ब्रम्हपूरीतही पारा ४७.६ अंश सेल्सियसवर होता..

ब्रम्हपूरी
४७.६ अंश सेल्सियस
ग्राफिक्स आऊट
वर्ध्यातलं तापमान ४७अंश सेल्सिय इतकं होतं तर गोंदियाचं तापमान ४६.१ अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं..
अकोला आणि यवतमाळमधील पारा ४५.२ अंश सेल्सियवर जाऊन पोहचला होता..

अकोला
४५.२ अंश सेल्सियस

यवतमाळ
४५.२ अंश सेल्सियस

वाशिमध्ये तापमान ४३ अंश सेल्सियस इतक नोंदवलं गेलं... विदर्भात ही उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्टकेलंय..
सतत वाढत्या तापमानामुळे विदर्भातील जनता हैराण झाली असून आणखी काही दिवस हे तापमान कायम राहणार असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत..
विदर्भातल्या तापमानानं जवळपास ४९ अंश सेल्सियस पर्यंत जाऊन पोहचलंय.तर नागपुरात काल गेल्या साठ वर्षातल्या सर्वाधिक 47.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
एरव्ही लोकांची वर्दळ असलेले नागपूरचे रस्ते दुपारच्यावेळी निर्मणुष्य होता...चेहेरा झाकल्याशिवाय लोक बाहेर पडत नाहीत...आणि याला कारणीभुत आहे सूर्य...गेल्या काही दिवसात तापमान वाढल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झालीय..त्यामुळेच लोक दुपारी घराबाहेर पडण्याचं टाळतात..
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सियशवच्या वर आहे... वातावरणातल्या बदलामुळे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात विदर्भात असंच चढतं तापमान असतं. वाढत्या तापमानामुळे नागरिक मात्र चांगलेच हैराण झालेत ..
या वाढत्या तापमानाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच ऑटोरिक्षा चालकांनाही फटका बसतोय. हातावर पोट असणारा हा वर्ग वातावरणाच्या कोपामुळे त्रस्त आहे. तर महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणा-या नागरिकांना रिक्षा उपलब्ध होत नसल्यानं गैरसोय होते.
ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम असल्याचं मत हवामन तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तसंच येत्या काही दिवसात तरी उन्हाच्या झळांपासून कुठलाही दिलासा मिळणार नसल्याचं नागपूर वेधशाळेच्या अधिका-यांनी म्हटलंय. त्यामुळं विदर्भातील नगरिक चातकासारखी प्रतीक्षा करतायत ती वरूणराजाची...

विदर्भातील हे वाढत तापमान पहाता अमेरिकेतील डेथ व्हॅलीच्या मार्गावर तर विदर्भ नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जाऊ लागलीय..कारण चंद्रपूरच तापमान ४९ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहचलयं...आणि डेथ व्हॅलीचं तापमान ५० अंश सेल्सिअसच्या पेक्षा जास्त आहे...

आग ओकणारा सूर्य...जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता...आणि या दोघांमध्ये वसलेलं हे खोरं.. होय... याला मृत्यूचं खोरं म्हटलं जातं...जगभर हे डेथ व्हॅली म्हणूनच प्रसिद्ध आहे..अमेरिकेतील नवाडा परिसरात पसरलेल्या या डेथ व्हॅलीत पाऊल टाकण्यापूर्वी प्रत्येकजण दोनदा विचार करतो...इथलं तापमान इतकं उष्ण आहे की त्यामुळे माणसाचा मृत्यू होतो..आणि त्यामुळेच या परिसरातला मृत्यूचं खोरं म्हटलं जातं..इथं वर्षभर ५७ डिग्री सेल्सियस तापमान असतं...पण इथलं तापमान इतक उष्ण का आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल..इथल्या उष्ण तापमानाला कारणीभूत आहेत खडकाळ प्रदेश..हा सगळा प्रदेश मोठमोठ्या दगडांनी भरलेला आहे..या दगडांवर सूर्य प्रकाश पडल्यामुळे ते गरम ह

First Published: Friday, May 24, 2013 - 00:02
comments powered by Disqus