अमेरिकेला हादरा !

१२७ वर्षांची परंपरा असलेल्या बोस्टन मॅरेथॉनला लक्ष्य करण्यात आलंय.. जगातल्या सहा महत्वाच्या मॅरेथॉनपैकी एक अशी ही बोस्टन मॅरेथॉन समजली जाते..

जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2013, 12:02 AM IST

www.24taas.com, मुंबई
१२७ वर्षांची परंपरा असलेल्या बोस्टन मॅरेथॉनला लक्ष्य करण्यात आलंय.. जगातल्या सहा महत्वाच्या मॅरेथॉनपैकी एक अशी ही बोस्टन मॅरेथॉन समजली जाते.. पण प्रतिष्ठेच्या या मॅरेथॉन दरम्यान एकापाठोपाठ एक दोन स्फोट झाले... आणि अवघ क्रिडाविश्व हादरुन गेलं...
अमेरिकेतील बोस्टन शहर एकापाठोपाठ झालेल्या स्फोटामुळे अक्षरश: हादरुन गेलं...हे स्फोट बोस्टनमधील ऐतिहासिक मॅरेथॉन दरम्यान झाले...या मॅरेथॉ़नमध्ये हजारो स्पर्धक सहभागी झाले होते..तसेच लाखो क्रिडाप्रेमी ती स्पर्धा पाहण्यासाठी तिथं उपस्थित होते..मॅरेथॉनमधील स्पर्धक जेव्हा फिनिशिंग लाईन जवळ जाऊन पोहचले त्याचवेळी एकापाठोपाठ एक दोन स्फोट झाले..त्या स्फोटामुळे सगळीकडं एकडे एकच खळबळ उडाली..या स्फोटानंतर परिसरात धुर आणि धुळीच लोट पसरले...
बोस्टन मॅरेथॉनमध्ये झालेल्या या साखाळी स्फोटामध्ये शेकडोलोक जखमी झालेत...तसेच स्फोटानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झालेत..हे दोन स्फोट भारतीय वेळेनुसार रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडले...मॅरेथॉनच्या फिनिशिंग लाईनपासून अडीचशे मीटर अंतरावर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत स्फोट झाला...पोलिसांनी मेंडेरिन हॉटेल परिसरातून एक जीवंत बॉम्ब हस्तगत केलाय..या स्फोटानंतर बोस्टन तसेच न्यूयॉर्कसह अमेरिकेतील सर्व शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला...सब-वे बंद करण्यात आले..एव्हडच नव्हे तर बोस्टनमधील सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली..
गेल्या ११७ वर्षांपासून बोस्टनमध्ये या मॅरेथॉनचं आयोजन केलंय जातंय...४२ किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये ५६ देशातील २७ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत...ही ऐतिहासीक मॅरेथॉन पहाण्यासाठी जगभरातून जवळपास ५ लाखहून अधिक क्रिडाप्रेमी बोस्टनमध्ये दाखल झाले आहेत..पण या स्पर्धो दरम्यान झालेल्या स्फोटामुळे या स्पर्धेवर भितीचं सावट पसरलंय..
नाईन ईलेव्हननंतर पुन्हा कुठे चुक झालीय याबद्दल आता तपासयंत्रणा पुन्हा कामाला लागल्यायत... बोस्टन साखळी स्फोटानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी या प्रकरणी सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय..याच दरम्यान पोलिसांनी एका संशयीत व्यक्तीचं छायाचित्र जारी केलं आहे...
अमेरिकेतील बोस्टन शहरात आयोजीत करण्यात आलेल्या मॅरेथॉन दरम्यान दोन स्फोट झाले...या स्फोटानंतर संपूर्ण अमेरिकेत सतर्कर्तेचा इशारा देण्यात आलाय..तसेच वॉशिंगटनमधील व्हाईट हाऊसचा परिसरात तात्काळा रिकामा करण्यात आला..अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलंय..
मॅरेथॉनमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी एका संशयीत व्यक्तीचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे...पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहे... 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळपास बारावर्ष अमेरिकेत एकही अशा प्रकारची घटना घडली नव्हती...कारण अमेरिकेच्या तपास यंत्रणांना अशा प्रकारचे हल्ले रोखण्यात यश मिळालं होतं...
9/11च्या दहशतवादी हल्यानंतर अमेरिकेनं अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सर्वोतोपाय केले...मात्र असं असतानाही बोस्टन मॅरेथॉ़न साखाळी स्फोटाने हादरीलय..त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेच्या नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलंय...
बोस्टन स्फोटांच्या घटनेमुळे अमेरिकेतील नागरिकांच्या मनात 9/11च्या दहशतवादी हल्ल्याची आठवणी ताज्या झाल्यात...कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याने अमेरिकेवर तो हल्ला घडवून आणला होता..त्या हल्ल्यानंतर जवळपास १२ वर्षांनी पुन्हा अमेरिका बॉम्बस्फोटामुळे हादरलीय..

बारा वर्षांपूर्वी टीव्हीवर ही दृश्य पाहून अवघं जग हादरुन गेलं होतं...कारण ही घटनाच तेव्हडी भयंकर होती..अमेरिकेतील वर्ल्डट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारीतवर एकापाठोपाठएक दोन प्रवासी विमानं येवून आदळली होती...अमेरिकेवर हा एकप्रकारचा हवाई हल्लाच होता..जागतीक महासत्ता म्हणवून घेणा-या अमेरिकेत न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती या दहशतवादी हल्ल्यामुळे निर्माण झाली होती..बलाढ्य अमेरिका या घटनेमुळे अक्षरश: हतबल झाली होती..अमेरिकेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती...अमेरिकेवार हा हल्ला घडवून आणला होता कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याने..आफगानिस्तानात बसून त्याने ते भयंकर षडयंत्र रचलं होतं..आपल्या अल कयदा या अतेरिकी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून तो भयंकर हल्ला घडवून आणला होता..पण या हल्ल्यानंतरअमेरिकेनं भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होवू नये यासाठी