दारु पार्टी, झी २४ तासचा दणका

राज्यभर निवडणुकांचा मौसम आहे.... अशातच एक खळबळजनक बातमी उस्मानाबादमधून.... जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी झोडली आणि तीही चक्क एका शाळेत. झी २४ तासच्या दणक्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Jan 27, 2012, 11:26 AM IST

www.24taas.com , उस्मानाबाद

राज्यभर निवडणुकांचा मौसम आहे.... अशातच एक खळबळजनक बातमी उस्मानाबादमधून.... जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी झोडली आणि तीही चक्क एका शाळेत. झी २४ तासच्या दणक्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबादेतल्या लासोना गावात मटणाच्या जेवणाच्या या पंक्तीच्या पंक्ती उठतायत. धक्कादायक बाब म्हणजे संत ज्ञानेश्वर शाळेत हा प्रकार सुरू आहे. हे कुठल्याही कार्याचं सेलिब्रेशन नव्हे तर काँग्रेसचा जिल्हा परिषद उमेदवार व्यंकट गुंड यानं केलेला हा धक्कादायक प्रकार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मटण पार्टीचं आमिष दाखवत सगळा गाव पार्टीसाठी गोळा झाला.  मटणाच्या जोडीला दारुही होती. ग्रामस्थांचा मनसोक्त ताव मारणं सुरू होतं, तेवढ्यात झी २४ तासचा कॅमेरा तिथं पोहोचला. झी २४ तासचा कॅमेरा पाहताच पार्टी देणाऱ्या व्यंकटेश गुंडसह सगळ्याच स्थानिक नेत्यांनी पळ काढला. या पार्टीची तक्रार करताच नायब सहसिलदार शाळेत पोहोचले पण कारवाई करायला त्यांनी टाळाटाळ केली.

पण हा सगळा प्रकार झी २४  तासच्या कॅमेऱ्य़ात कैद झाल्यानं अखेर कारवाई करणं भागच पडलं.  मटण आणि दारुची पार्टी झाल्यानंतर दारुच्या बाटल्याही शाळेच्याच आवारात टाकून दिल्या होत्या. तसंच शाळेच्या वर्गामध्येच स्वयंपाक केल्याच्या खुणाही झी २४ तासच्या कॅमे-यानं टिपल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेस उमेदवारानं हा प्रताप केलाय. आचारसंहितेच्या ऐशीतैशीचं हे प्रातिनिधिक उदाहरण. प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी शरमेनं मान खाली घालायला लावणारं असल्याने संताप व्यक्त होत आहे.

[jwplayer mediaid="36375"]