बोलिव्हियन 'पितृपक्ष' !

बोलिव्हियन नागरिकांनी १ नोव्हेंबरला ऑल सोल्स डे पाळला. बोलिव्हियन परंपरेनुसार या दिवशी सर्व मृतात्मे आपल्या स्वकियांच्या भेटीसाठी पृथ्वीवर येतात आणि आयुष्यात घालवलेले आनंदी क्षण पुन्हा जगतात, असा समज आहे.

Updated: Nov 4, 2011, 02:18 PM IST

झी २४ तास वे टीम, बोलिव्हिया

 

बोलिव्हियन नागरिकांनी १ नोव्हेंबरला 'ऑल सोल्स डे' पाळला. बोलिव्हियन परंपरेनुसार या दिवशी सर्व मृतात्मे आपल्या स्वकियांच्या भेटीसाठी पृथ्वीवर येतात आणि आयुष्यात घालवलेले आनंदी क्षण पुन्हा जगतात, असा समज आहे. यावर्षीही बोलिव्हियन नागरिक 'ऑल सोल्स डे' पाळण्यासाठी ग्रेव्हयार्डमध्ये जमले होते. १ नोव्हेंबरला दुपारी सुरु झालेले विधी २ नोव्हेंबरला दुपारपर्यंत सुरु होते. यादरम्यान मृत पावलेल्या आपल्या आप्तस्वकियांचे आवडीचे पदार्थ आणि पेयही नातेवाईकांनी आवर्जून आणले होते. ब-याच जणांनी मानवी आकाराचे खास ब्रेड तयार करून आणले होते. बोलिव्हियात या ब्रेडना 'तांता वावा' म्हणतात.