झी मीडिया इम्पॅक्ट: कोटमची उलट प्रथा, झाली सुलट!

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, October 8, 2013 - 15:36

www.24taas.com, झी मीडिया, येवला
झी मीडियाच्या वृत्तामुळं येवल्याच्या कोटमगावात वर्षानुवर्षे सुरु असलेली उलटं टांगण्याची अनिष्ट प्रथा बंद झालीय. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रौत्सवादरम्यान कोटमगावातल्या जगदंबा माता मंदिरात बायकांना उलटं टांगत नवस फेडण्याची प्रथा सुरु होती.
इच्छापूर्तीनंतर अशाप्रकारे नवस फेडण्याची प्रथा सुरु होती. याबाबत झी मीडियानं काल वृत्त प्रसारित केलं. ही बातमी पाहून ही प्रथा बंद करत असल्याचं झी मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. त्यामुळं आता ही अनिष्ट प्रथा बंद झाल्यानं समाजप्रबोधनातही झी मीडिया एक पाऊल पुढं असल्याचं स्पष्ट झालंय.
अशी होती ही अघोरी प्रथा-
नवरात्रौत्सव सुरु असतांना कोटमगावच्या जगदंबा मंदिरासमोर महिलांनी स्वत:ला उलटे टांगून नवस फेडायला सुरुवात केलीय. तिसऱ्या माळेपासून सुरू झालेली ही नवसपूर्तीची काहीशी अघोरी प्रथा आता दसऱ्यापर्यंत सुरूच राहते. त्याशिवाय नवरात्रौत्सवात स्वतःच घटी बसण्याचीही परंपरा कोटमगावात आहे.
या काळात संपूर्ण ९ दिवस भाविक आपले घरदार सोडून मंदिरात येतात आणि मंदिर परिसरातील भक्त निवासांमध्ये उपवास करीत घटी बसतात. जवळपास २ हजार महिला अशाप्रकारे कोटमगावात घटी बसल्या होत्या.
मात्र आता झी मीडियाच्या बातमीनंतर ही प्रथा बंद करत असल्याचं कोटमगावच्या विश्वस्तांनी स्पष्ट केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013 - 15:32
comments powered by Disqus