कलंक

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, December 18, 2012 - 23:40

www.24taas.com, मुंबई
मायानगरीत महिलांच्या सुरक्षिततेचा बोजवारा उडला असल्याचं पोलिसांच्या दफ्तरावर नजर टाकल्यास लक्षात येईल.. गेल्या पाच वर्षातील ही आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.
गेल्या काही महिन्यात मायानगरी मुंबई महिला असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय...अपहरण, बलात्कार,खून, लैंगिक छळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांना लक्ष्य केलं जातंय...गेल्या पाच वर्षातील मुंबईची आकडेवारी पहाता मायानगरीत महिला किती असुरक्षित आहेत हे सहज लक्षात येईल ..

2011
-------
एकूण गुन्हे 32,647

2011
-------
महिलांविषयीचे गुन्हे 32,647

5 वर्षात महिलांविषयीच्या गुन्ह्यात 26% वाढ

ही आकडेवारी पहाता मुंबईत महिलांच्या सुरक्षेची अवस्था किती केविलवाणी झालीय हे लक्षात येईल. गेल्या पाच वर्षात मुंबईत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय..

2007
------------
174 गुन्हे

2008
------------
218 गुन्हे

2009
------------
182 गुन्हे

2010
------------
194 गुन्हे
2011
------------
221 गुन्हे
दरवर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढ होत गेल्याचं पहायला मिळेल...बलात्काराप्रमाणेच गेल्या पाच वर्षात विनयभंगाच्या घटनांही वाढल्या आहेत...
2007
------------
365 गुन्हे

2008
------------
436 गुन्हे

2009
------------
400 गुन्हे

2010
------------
475 गुन्हे
2011
------------
553 गुन्हे

विनयभंगाप्रमाणेच लैंगिक छळाच्या घटना वाढत आहेत....
लैंगिक छळ

2007
------------
112 गुन्हे
2008
------------
121 गुन्हे

2009
------------
101 गुन्हे

2010
------------
138 गुन्हे

2011
------------
162 गुन्हे

विनयभंग, लैंगिक छळ, बलात्काराच्या घटनांप्रमाणेच अपहरणांच्या घटनांची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे....
अपहरण

2007
------------
120 गुन्हे
2008
------------
116 गुन्हे

2009
------------
86 गुन्हे

2010
------------
146 गुन्हे

2011
------------
266 गुन्हे

मुंबईत महिला किती असुरक्षित आहेत हे गेल्या पाच वर्षात बळी पडलेल्या महिलांच्या संख्येवरुन तुमच्या लक्षात येईल...

खून

2007
------------
230 गुन्हे

2008
------------
210 गुन्हे

2009
------------
217 गुन्हे

2010
------------
228 गुन्हे
2011
------------
203 गुन्हे
महिलांना केवळ गुन्हेगारांकडून लक्ष्य केलं जातंय असं नाही तर कौटुंबीक वादातूनही त्यांनना छळ सहन करावा लागतोय...

पती आणि नातेवाईकांकडून छळ

2007
------------
380 गुन्हे

2008
------------
502 गुन्हे

2009
------------
434 गुन्हे

2010
------------
312 गुन्हे
2011
------------
393 गुन्हे

मुंबईतील ही आकडेवारी पहाता...पोलीस यंत्रणा काय करतेय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्या शिवाय रहणार नाही..
रविवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान देशाची राजधानी दिल्लीत एक भयंकर घटना घडली... सार्वजनिक वाहतूक करणा-या बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला....या घटनेमुळे सगळा देश हादरुन गेलाय..
सीसीटीव्ही कॅमे-याने टीपलेल्या या दृश्यात दिसत असलेल्या दिल्लीतील याच बसमध्ये संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडलीय. देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात वर्दळ

First Published: Tuesday, December 18, 2012 - 23:40
comments powered by Disqus