चक्क टाळी एका हाताची...अकोल्यातील अवलिया

एका हाताने टाळी वाजत नाही, ही म्हण अकोल्यातील एका तरुणाने खोटी ठरवलीये. अमोल अनासाने या तरुणानं एका हाताने 'टाळी' वाजविण्याची कला अवगत करीत विक्रमाची नोंद केलीये. अमोलनं एका तासात एका हाताने तब्बल शंभर नाही दोनशे नाही तब्बल 7 हजार टाळ्या वाजवून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.

Updated: Jul 4, 2014, 08:34 AM IST
चक्क टाळी एका हाताची...अकोल्यातील अवलिया

अकोला : एका हाताने टाळी वाजत नाही, ही म्हण अकोल्यातील एका तरुणाने खोटी ठरवलीये. अमोल अनासाने या तरुणानं एका हाताने 'टाळी' वाजविण्याची कला अवगत करीत विक्रमाची नोंद केलीये. अमोलनं एका तासात एका हाताने तब्बल शंभर नाही दोनशे नाही तब्बल 7 हजार टाळ्या वाजवून एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.

'एक हात से ताली बजती नही'.... असं म्हटलं जातं... पण, मंडळी!... आता ही म्हण जरा सांभाळूनच वापरा... कारण आता एका हातानेही टाळी वाजू शकतेय, बरं का !... अकोल्यातील अमोल अनासाने या बावीस वर्षीय तरुणानं एका हाताने 'टाळी' वाजविण्याची कला अवगत करीत आपल्या वेगळा ठसा उमटवलाय. त्याला दहावीपासून एका हाताने टाळी वाजवण्याचा छंद जडलाय. आपल्या हाताच्या बोटांना रबरासारखे तळ हातावर आपटून त्यामधून टाळी वाजवण्यासारखा आवाज त्याने निर्माण केलाय. तो दोन्ही हाताने अशी टाळी वाजवू शकतो.

अमोल अनासाने, 'एका हाताने टाळी वाजविणारा'. अमोलच्या घरची परिस्थिती गरीबीची... दोन भाऊ, एक बहिण आणि आई-वडील... अमोल मोठा अन दोन भावंडे लहान... वडील एका वकिलाकडे कारकुनाची नोकरी करतात तर आई गृहिणी... त्यामुळेच वयाच्या पंधराव्या वर्षापासून अमोल लागलेला हा 'हटके' छंद आधी त्याच्या कुटुंबियांच्या हेटाळणीचा विषय... मात्र अमोलने हार न मानता आपला हा छंद जोपासला. अमोलच्या विक्रमानंतर त्याच्या पालकांचा ऊर अभिमानाने भरून आलाय.

सध्या अमोलचं 'बी.कॉम'.पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालंय. आता तो बँकिंगच्या परीक्षांचा अभ्यास करतोय. त्याच्या या छंदाला खरी उभारी मिळालीय ती 'बी.कॉम'चे शिक्षण घेत असतांना राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागातून... तिथूनच त्याला विक्रमाची प्रेरणा मिळालीय. अमोलला इतरही छंद प्रिय आहेत. अमोल 'डोनाल्ड डक'ची 'मीमिक्री'ही करतोय.

एका तासात एका हाताने सलग 7000 टाळ्या वाजविण्याचा विक्रमाची नोंद 'इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड'च्या वतीने घेण्यात आलीय. आता अमोलचे पुढचे लक्ष्य आहेय ते 'गिनीज बुक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव नोंदविण्याचे... त्यातही त्याला यश 'टाळी' देईल यात शंका नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.