राजू शेट्टींना जामीन मंजूर पण, तीन तालुक्यांत प्रवेशबंदी , raju shetty on bail

राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...

राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...
www.24taas.com, बारामती

ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय.

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करतानाच बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं राजू शेट्टी यांना त्यांना बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई केलीय. ऊसाला ३००० रूपये दर देण्याची मागणी करत राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. गेल्या आठवड्याभरापासून हे आंदोलन सुरू आहे. ठिकठिकाणी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर राजू शेट्टी यांना गेल्या सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. याआधी इंदापूर न्यायालयात राजू शेट्टींना जामीन नाकारला होता पण आज बारामती न्यायालयानं मात्र राजू शेट्टींना जामीन मंजूर केलाय.

First Published: Friday, November 16, 2012, 13:28


comments powered by Disqus