कुठे गेले ते आयपीएलचे चमचमते सितारे? - Marathi News 24taas.com

कुठे गेले ते आयपीएलचे चमचमते सितारे?

www.24taas.com, मुंबई
 
ओपनिंग सेरेमनी वगळता आयपीएलच्या या सीझनमध्ये क्रिकेटप्रेमींना आकर्षित करेल असं काहीच घडलं नाही. प्रीती झिंटा आणि शिल्पा शेट्टी या ग्लॅमरस चेहऱ्यांचा भावही उतरला आहे. केवळ डेक्कन चार्जर्सची मालकीण गायत्री रेड्डी आणि मुंबईच्या टीमच्या सर्वेसर्वा निता अंबानी या दोघींभोवतीच सध्या आयपीएलचं ग्लॅमर फिरतं आहे.
 
शिल्पा शेट्टी, प्रिती झिंटा, निता अंबानी आणि गायत्री रेड्डी यांनी क्रिकेट या मेल डोमिनेटेड गेममध्ये आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलं आहे. क्रिकेटला बॉलीवूड तडाका लागला आणि आयपीएलला नवं ग्लॅमर मिळालं. सीझनच्या सुरुवातीपासूनचं शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटानं आपल्या स्टारडममुळे  साऱ्यांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
 
तर निता अंबानी आणि गायत्री रेड्डीही यामध्ये मागे राहिल्या नाहीत. मात्र, आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये शिल्पा शेट्टीचा हल्लाबोल आणि प्रीती झिंटाची जादू की झप्पी पाहायलाच मिळाली नाही. या दोघींची उणीव प्रकर्षानं जाणवत असली तरी मुंबई इंडियन्सच्या टीमच्या ओनर निता अंबानी यांनी आपल्या टीमला व्यवस्थित सांभाळलं आहे. या टीममध्ये सर्वाधिक स्टार क्रिकेटपटू आहे. हाय प्रोफाईल क्रिकेटपटूंची मांदियाळी असली तरी, त्यांनी या क्रिकेटपटूंवर कंट्रोल ठेवला आहे. टीमच्या युवा आणि स्टार क्रिकेटपटूंना त्यांनी एकत्र बांधून ठेवलं आहे.
 
मुंबईच्या डग आऊटमध्ये त्या नेहमीच आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढवतांना दिसतात. युवा क्रिकेटपटूंचाही त्यांना चांगला सपोर्ट मिळतो आहे. तर डेक्कन चार्जर्सची धुरा ही गायत्री रेड्डी सांभाळते. डेक्कन क्रोनिकलच्या वेंकटरमन यांची मुलगी असलेली गायत्री नेहमी आपल्या टीमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होत असते. तिच्या मॅनेजमेंटचं कौतुक सारेचजण करतात. युवा असल्यानं तिचा मैदानावरचा जोश पाहण्यासारखा असतो.
 
आयपीएलच्या ऑक्शनमध्येही ती आवर्जुन उपस्थित असते. प्लेअर्सच्या खेरदीबाबत तिचा निर्णय हा महत्त्वाचा असतो. आयपीएलच्या महिला राजमधील ती सर्वात युवा मेंबर आहे. गायत्रीची उपस्थिती ही क्रिकेटप्रेमींच नेहमी लक्ष वेधून घेते. या वेळच्या आयपीएल सीझनमध्येही ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरते आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, April 08, 2012, 13:48


comments powered by Disqus