Zeenews logo
English   
Tuesday, May 21, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

कोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार

www.24taas.com, कोयना 
 
 
कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे.
 
 
या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे.  जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मिती आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी पाणी मिळणार आहे.
 
 
कोयनेच्या पाण्याचा हा थरार पुन्हा अनुभवता येणार आहे.... कोयना जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहे.... हा प्रयोग जितका आकर्षक, तितकाच थरारकही.... त्यासाठी सुमारे साडेचार किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आलाय...... जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या जुन्या बोगद्याला हा नवीन  बोगदा जोडण्यात आलाय. कोयनेतील पाणी आणि बोगदा यामध्ये आता केवळ ५ मीटरचा खडक आहे. दीड टन स्फोटकांच्या सहाय्यानं दोन ठिकाणी स्फोट घडवून हा खडक फोडला जाईल तेव्हा कोयनेतील पाण्याच्या अशा लाटा उसळतील.  अर्थात हे सगळं करत असताना कोयनेच्या सुरक्षेबाबत कमालीची सतर्कता बाळगण्यात येणार आहे.
 
 
यापूर्वी १३ मार्च २००९ रोजी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती यानिमित्तानं होणार आहे. दोन वर्षांचे परिश्रम आणि दहा कोटी रुपये खर्चून हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे.. नॉर्वेच्या तंत्रज्ञानाची मदतही त्यासाठी घेण्यात आली आहे. या टँपिंगमुळे सिंचनासाठी 20 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. कोयना धरणाचा सध्याचा उपलब्ध पाणीसाठा १०५.२५ टीएमसी आहे. त्यापैकी २३ टीएमसी पाणी सिंचन तसेच इतर नागरी गरजांसाठी वापरले जाते. ६७.५ टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती चालते, यातून कोयानातून १९६० मेगावॉट विजेची निर्मिती होते. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी खाली जाते. अशा परिस्थितीत दुष्काळी भागाला पाणी पुरवायचं झाल्यास वीज निर्मिती खंडित होते. वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी लेक ट्यापिंगचा पर्याय शोधण्यात आला आहे.
 
 
या प्रयोगामुळे कोयनेतील वीजनिर्मिती अबाधित तर राहीलच, शिवाय दुष्काळी भागाला पाणीही मिळेल..... महत्वाचं म्हणजे या प्रकल्पासाठी आपल्याच तंत्रज्ञांनी केलेली ही दर्जेदार कामगिरी जगात महाराष्ट्राचं नाव उंचावणारी आहे.... आणि ज्या यशवंतराव चव्हाणांचे कोयना धरणाच्या उभारणीत महत्वाचं योगदान होतं, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात कोयनाचा हा चार-ब प्रकल्प देशाला अर्पण होत आहे हा देखिल एक योगायोग आहे.

First Published: Wednesday, April 25, 2012, 11:28

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: