Zeenews logo
English   
Monday, May 20, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

महाराष्ट्रात बंदला हिंसक वळण

 


  www.24taas.com


 


 


पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागला. आत्तापर्यंत जवळजवळ 1722 सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. पाहुयात आज सकाळपासून कुठे कुठे काय काय घडलं... भारत बंदला कसा मिळाला महाराष्ट्रात प्रतिसाद...


 


 



 नाशिक


बंदवर खाकीचं सावट - एनडीएने पुकारलेल्या बंदला नाशिक शहरात संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शहरातील मुख्य बाजारपेठ बंद असून एमजीरोड परिसरातील दुकाने बंद आहेत. चाकरमान्यांची कामे मात्र सुरळीतपणे सुरु आहेत. रोजची वाहातूक आणि सिटी बसेस सुरळीतपणे सुरु आहेत. भाजपा आणि माकप कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सर्वकाही सुरळीत ठेवले आहे. यामध्ये भाजपाचे गिरीश महाजनांसह काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे नेहमीच बसेसच्या काचा फुटणा-या नाशिकमध्ये एकाही बसवर दगडफेक झालेली नाही पोलिसांच्या खाकीचं सावट आजच्या बंदवर दिसून आलं. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सारंगल यांच्या कारवाईच्या भीतीयुक्त दहशतीने नाशिकचा बंद समिश्र मात्र शांततेत होतो आहे.


 


 


नागपूर 


स्टार बससेवा बंद -  नागपूरमध्ये स्टार बससेवा बंद करण्यात आलीय. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासून ११७ बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५ बसेस फोडण्यात आल्या. त्यामुळं स्टार बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काल रात्रीही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी १० बसेसची तोडफोड केली. नागपूर बस स्थानक आणि वैद्यनाथ चौकात ही घटना घडली. त्यामुळं रात्री उशिरापर्यंत तणाव होता. विरोधी पक्षांनी बंद यशस्वी करण्यासाठी कंबर कसलीये. कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहता आजच्या बंदला हिंसक वळण लागल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये भारत बंदच्या पार्श्वभूमीवर 5 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.


 


 


 कोल्हापूर


पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. शहरात कमी - अधिक प्रमाणात दुकानं उघडी असल्याचं चित्र आहे. मात्र रस्त्यांवर नेहमीच्या तुलनेत वर्दळ कमी आहे. शिवसेना, भाजप आणि आरपीआयनं शहरातून रॅली काढून व्यापा-यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं.


 


 


 औरंगाबाद


औरंगाबादमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय. सकाळपासूनच व्यापा-यांनी दुकानं उघडली नाहीत. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेसह इतर भागातही बंदचा प्रभाव दिसून येतोय. शिवसेनेनं रॅली काढून नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. नागरिकांनीही बंदमुळे बाहेर बाहेर पडण्याऐवजी घरी थांबायलाच पसंती दिल्यानं, रस्त्यावर तुरळक वाहतूक दिसून येतेय.


 


 


अकोला 


अकोल्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले गेले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एका कार्यकर्मासाठी मुख्यमंत्री अकोल्यात आले होते. विमानतळाबाहेरच भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.  यावेळी २५-३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.


 


 



पुणे 



  •  पुण्यात पेट्रोल दरवाढी विरोधात भाजप शिवसेनेनं बेबाग चौकात आंदोलन केलं. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागलंय. कोथरुड, डेक्कान भागात १३ बसेसची तोडफोड करण्यात आलीय. रिक्षा, पीएमपी बसेस सुरु असल्या तरी रस्त्यावर नेहमीपेक्षा कमी गर्दी पहायला मिळतीय. पेट्रोल दरवाढीविरोधात आज पुकारलेल्या भारत बंदमुळे राज्यातल्या जनजीवनावर परिणाम रात्रीपासूनच जाणवू लागला होता. काल रात्री पीएमपीएलच्या चार बसेसवर काही अज्ञातांनी दगडफेक केली. भांडारकर रोड, डेक्कन, गोरवले नगर आणि फर्ग्युसन रोडवर ही दगडफेक झाली.


 



ठाणे


ठाण्यामध्येही बंदला रात्रीपासूनच हिंसक वळण लागलंय. भाजप कार्यकर्त्यांनी रात्रीच एक टीएमटीची बस आणि हॉटेलची तोडफोड केलीए. या तोडफोडप्रकरणी सात भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


 


 


नाशिक  


नाशिकमध्ये बंदला सकाळच्या सत्रात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.


 


 


 


व्हिडिओ पाहा...


 



 




First Published: Thursday, May 31, 2012, 14:56

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: