Zeenews logo
English   
Wednesday, June 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

युवराज सिंग फिट

www.24taas.com
 
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला....सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर युवराजनं ही माहिती दिली आहे. केमोथेरपीच्या उपचारांचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती युवीनं ट्विटरवर दिली आहे.
 
त्यामुळे युवीला आता घरी परतण्याचे वेध लागले आहेत. मायदेशात परतण्यासाठी आपण खूपच आतूर असल्याचं युवीनं लिहिलंय. युवराज सिंग गेल्या महिन्यापासून अमेरिकेमध्ये केमोथेरेपीचे उपचार घेत आहे.
 
दरम्यान अमेरिकेत उपचार घेत असलेल्या युवराज सिंग याचे उपचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले असून पुढील चार दिवसांत युवराजची केमोथेरपी संपणार आहे. युवराजने ट्विटरवर लिहीलं आहे, “केमोथेरपी आता शेवटच्या टप्प्यात आहे. हे संपण्याची मी वाट पाहातोय. देवा, मला यातून मोकळं कर.” गेल्याच महिन्यात युवराजने ट्विट केलं होतं की, त्यांचा फुप्फुसांचा ट्युमर नष्ट झाला आहे.
 
गेल्या महिन्यापासून बोस्टनमध्ये उपचार घेत असलेला युवराज मे महिन्यात पुन्हा खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. उपचारांदरम्यान युवराजचे केसही गेले होते. युवराजवरील उपचार मार्चच्या शेवट आठवड्यापर्यंत चालणार आहे. यानंतर एप्रिलमध्ये रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल.
 
वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भुमिका बजावणारा युवराज गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत एकही टूर्नामेंट खेळू शकलेला नाही. युवराज पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी केव्हा येईल यांचीच त्याचे चाहते वाट पाहत आहेत. युवराजने ३७ टेस्टमध्ये ३४.८० च्या स्ट्राईक रेटने १७७५ रन काढले आहेत. तर २७४ वनडे मध्ये ३७.६२ च्या स्ट्राईक रेटने ८०५१ रन काढले आहेत. तर २३ टी-२० मॅचमध्ये त्याच्या नावावर ५६७ रन केले आहेत.

First Published: Sunday, March 18, 2012, 12:03

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: