Zeenews logo
English   
Thursday, May 23, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

रितेशच्या विवाहाला शाहरुख,अभिषेक आणि राज ठाकरे

www.24taas.com, मुंबई
 
आज रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचा विवाह झाला. बॉलिवूडमधला एक शानदार विवाह सोहळा ‘ग्रँड हयात’ येथे मोठ्या थाटात पार पडला. या लग्नाला बॉलिवूडच्या स्टार्ससह राजकारणातल्या हस्तीही उपस्थित होत्या.
 
हा लग्न सोहळा पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने साजरा झाला. नवरदेवांनी क्रिम कलरची शेरवानी परिधान केली होती, तर नववधूची लाल साडी कॉश्चुम डिझायनर निशिका लुल्ला हिने डिझाइन केली होती. निशिकानेच जेनेलियाला महाराष्ट्रीयन पद्धतीने सजवलं होतं.
 
दुपारच्या सुमारास वरात ग्रँड हयात येथे पोहोचली. लग्नाला अभिषेक बच्चन आपली आई जया बच्चन हिच्यासोबत आला होता. तर ‘बाजीराव सिंघम’ अजय देवगण आपली पत्नी काजोलसह उपस्थित होता. साजिद खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ इ. स्टार मंडळी विवाहास जमली होती. अभिनेत्री असिन, अमृता राव यादेखील विवाहास आल्या होत्या. आशिष चौधरी जेनेलियाच्या बहिणींपासून नवरदेवाचे जोडे लपवून ठेवत होता. या कलाकारांशिवाय मुख्य आकर्षण म्हणजे शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासोबत लग्नाला आला होता.
 
 ‘रितेश- जेनेलिया’चा विवाह सोहळा (फोटो फिचर)
 
राजकीय क्षेत्रातील मोठमोठी व्यक्तिमत्वंही या लग्नास आवर्जून उपस्थित होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांव्यतिरिक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक आले होते. राज ठाकरे इतर कुठेही न घुटमळता सरळ मंडपात जाऊन जोडप्यास भेटले. राज यांचे पुतणे आणि शिवसेनेच्या युवासेनेचे आदित्य ठाकरे आपल्या आईसोबत विवाहास आले होते.   लग्नाच्या संगीत सोहळ्याची जबाबदारी करण जोहरने आपल्या खांद्यावर घेतली होती. लग्नानंतर शाहिद कपूरने ट्विट केलंय- आणि G (जेनेलिया)चा विवाह झाला... अविश्वसनिय :) ! तर स्वतः रितेश देशमुखने आपला आणि आपल्या पत्नीचा फोटो ट्विटरवर अपलोड करून शीर्षक दिलं आहे- मि. अँड मिसेस. देशमुख
 
रितेश-जनेलिया या नवविवाहित जोडप्याला 24taas.com वेब टीमतर्फेही हार्दिक शुभेच्छा !
 
 

First Published: Friday, February 03, 2012, 18:05

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: