'सवाई'ची गतरम्यता ! - Marathi News 24taas.com

'सवाई'ची गतरम्यता !

www.24taas.com, मुंबई
 
नाटकवेड्या तरुणाईसाठी अत्यंत चुरशीची समजली जाणारी एकांकिका स्पर्धा म्हणजे सवाई एकांकिका. सर्वोत्तम एकांकिकांची शृंखला यात दरवर्षी पाहायला मिळते.याच मानाच्या सवाई स्पर्धेचा यंदा रौप्यमहोत्सव थाटात साजरा होणार आहे. बघता बघता 'सवाई'ने पंचविशी गाठली.
 
मंजुळा, गप्पा,मनोमिलन, पोपटी चौकट, हाफ पॅण्ट यांसारख्या अविस्मरणिय एकांकिका यावेळी पाहायला मिळतील. सवाई नॉस्टॅल्जियामध्ये येत्या २३ जानेवारीला अत्यंत गाजलेली मंजुळा ही एकांकिका पुन्हा रंगमंचावर आणताना दिग्दर्शक निशिकांत कामत फारच एक्सायटेड आहे. ज्या एकांकिकेने आदितीला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली तीच एकांकिका पुन्हा सादर करताना आदितीही नॉस्टॅल्जिक झाली ...
 
 
‘गप्पा’ ही योगेश सोमण यांची एकांकिकादेखील याच सर्वोत्तम पाच एकांकिकांमध्ये पाहायला मिळेल. सवाई दरबारात संजय पवार यांची ‘दुकान कुणी मांडू नये’ ही एकांकिका सादर होणार आहे.
 
सवाई अभिनेता, सवाई अभिनेत्री, सवाई दिग्दर्शक असे सबकुछ सवाई कलाकार या रौप्यमहोत्सवात पुन्हा पाहायला मिळतील. त्यामुळे नाटकवेड्या मराठी रसिकांसाठी ही एक अनोखी मेजवानी असेल यात शंकाच नाही.
 

First Published: Sunday, January 22, 2012, 10:39


comments powered by Disqus