विंदूच्या कोडवर्डस अर्थ `झी मीडिया`च्या हाती

विंदू सिंगला अटक केल्यानंतर धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतोय. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरी, मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप जप्त केलाय. त्यातली कोड लँग्वेज ‘झी मीडिया’च्या हाती लागलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 29, 2013, 04:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विंदू सिंगला अटक केल्यानंतर धक्कादायक गोष्टींचा उलगडा होतोय. पोलिसांनी त्याच्याकडून एक डायरी, मोबाईल, आयपॅड, लॅपटॉप जप्त केलाय. त्यातली कोड लँग्वेज ‘झी मीडिया’च्या हाती लागलीय.

विंदूच्या कोडवर्डचे अर्थ काय?
गुरुजी - गुरुनाथ मयप्पन
जॅक - विंदू दारासिंग
शानू - एक बुकी
रमेश भाई - बुकी रमेश व्यास
पीजे भाई - बुकी पवन जयपूर
एसजे भाई दिलवाला - बुकी संजय जयपूर
बनी - दिल्लीतला बडा बुकी
चिडिया - हवाला ऑपरेटर

विंदूच्या डायरीत आढळलेल्या कोडवर्डमध्ये लिहलंय काय... पाहा....
 गुरूजी टू जॅक - ५ लगाया ३ खाया (अर्थ - मय्यपननं ५ लाख सट्टा लावण्यासाठी विंदूला दिले होते. त्यापैकी ३ लाखांचा सट्टा विंदू हरला)
 शानू टू जॅक - २ गया (अर्थ - एका बुकीनं २ लाख रुपये विंदूला दिले होते)
 रमेश भाय – १ आया (अर्थ - बुकी रमेश व्यासनं एक लाख विंदूला दिले होते)
 पीडी झीरो (अर्थ - उरले शून्य)
 गुरूजी टू जॅक - लगाया ३ - खाया ० - दिया ५ (अर्थ - मयप्पननं ३ लाखांचा सट्टा लावला. त्यावेळी तो ५ लाख जिंकला)
 पीजे भाय - १ आया - चिडीया (अर्थ - बुकी पवन जयपूरने चिडीया म्हणजे हवाला ऑपरेटरतर्फे १ लाख विंदूला दिले)

विंदूला सट्टा लावण्याचा नाद होता. त्याच्याकडे आढळलेल्या कोडवर्डनं पोलिसांची सट्टेबाजांविरुद्ध असलेली पकड आणखी घट्ट होणार आहे.
फोटोफीचर विंदूच्या कोडवर्डसचा अर्थ...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.