अंकित चव्हाणचे लग्न रखडले, कोर्टाने जामीन नाकारला

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत आणि अजित चंडिलाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोघांनाही ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे..

Updated: May 29, 2013, 11:02 AM IST

www.24taas.com, झी, मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत आणि अजित चंडिलाच्या अडचणी वाढल्या आहेत. दोघांनाही ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे..
श्रीसंत आणि चंडिला याशिवाय इतर बुकी चंद्रेश आणि टिंकू मंडीलासुद्धा ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे याप्रकरणी अटकेत असलेल्या अंकित चव्हाणला कोर्टानं झटका दिला आहे.. २ जून रोजी लग्न ठरलं असल्यानं जामीन मिळावा यासाठी त्यानं केलेला अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांचही नाव आहे. आतातर बुकी संजय जयपूरन रौफ यांना लाखोंच्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलय. अंपायर रौफ यांना आदिदास नायकीचे सहा शूज दिले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.