मयप्पन आणि विंदूची समोरासमोर होणार चौकशी

By Shubhangi Palve | Last Updated: Friday, May 24, 2013 - 21:39

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सला उत्तर देताना गुरुनाथ मयप्पन आज मुंबई पोलिसांसमोर दाखल झालेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिलेल्या माहितीनुसार, विंदू दारासिंग आणि चेन्नई सुपर किंग्सचा टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पन यांना दोघांना समोरासमोर बसवून आता या प्रकरणात पुढची चौकशी केली जाणार आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मयप्पनची चौकशी होणार आहे.
मयप्पन मुंबई विमान तळावर दाखल झाले त्यावेळी अगोदरच असलेल्या क्राईम ब्रान्चच्या टीमनं त्यांना ताब्यात घेतलंय. चौकशीनंतर मयप्पन यांच्या अटकेबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला विंदू सिंग स्वत: फिक्सिंग करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. त्यामुळं अधिक चौकशीसाठी विंदूच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. आज कोर्टात सुनावणीच्यावेळी विंदू सिंगला रडूही कोसळलं.

विंदूचे बुकींशी साटेलोटे असल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र तो स्वत: सट्टा लावतो आणि स्वीकारतोदेखील त्यामुळं त्याची सखोल चौकशी करण्याची गरज पोलिसांनी कोर्टासमोर व्यक्त केलीय. विंदूच्या चौकशीतून यापूर्वीच नवनवीन खुलासे बाहेर आले आहेत. त्यामुळं पुढच्या काळातही अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याच्या कोठडीत २८ मेपर्यंत वाढ करण्यात आलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013 - 21:39
comments powered by Disqus