तीन तासांच्या चौकशीनंतर मयप्पनला अटक

स्पॉट फिक्संग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा गुरुनाथ मयप्पन याला तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 25, 2013, 12:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्संग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा गुरुनाथ मयप्पन याला तब्बल तीन तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आलंय.
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी गुरुनाथ मयप्पन याच्याविरोधात पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागलेत. शनिवारी मयप्पन याला किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्सला उत्तर देताना गुरुनाथ मयप्पन शुक्रवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांसमोर दाखल झाला होता. मयप्पन मुंबई विमान तळावर दाखल झाला त्यावेळी अगोदरच असलेल्या क्राईम ब्रान्चच्या टीमनं त्यांना ताब्यात घेतलं होतं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं विंदू दारासिंग आणि चेन्नई सुपर किंग्सचा टीम प्रिन्सिपल गुरुनाथ मयप्पन या दोघांना समोरासमोर बसवून या प्रकरणाची अधिक चौकशी केली.