साक्षी धोनी आणि विंदू दारासिंग साथसाथ!

By Prashant Jadhav | Last Updated: Tuesday, May 21, 2013 - 16:00

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अभिनेता विंदू दारा सिंग याला अटक करण्यात आली. विंदू आणि धोनीची पत्नी साक्षी सिंगला आयपीएलच्या सामने एकत्र पाहताना आपण टीव्हीवर पाहिले आहे. त्यामुळे यामुळे आता धोनी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्रिकेटर आणि बॉलिवुडचे नाते तसे जुने पण दारासिंग आयपील सहाच्या अनेक सामन्यात धोनीची पत्नी साक्षी सिंग हिच्या शेजारी बसून काय करत होता असा प्रश्न निर्माण होत आहे. धोनी आणि हरभजनने माझ्या मुलाला फसवले असे श्रीशांतच्या वडिलांनी आरोप लावले होते. विंदू दारा सिंग याच्या अटकेनंतर पुन्हा एकदा या आरोपांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
विंदू दारा सिंग आणि धोनीचा संबंध काय.... का बसला होता विंदू साक्षीच्या शेजारी..... असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 21, 2013 - 16:00
comments powered by Disqus