IPL स्पॉट फिक्सिंग: साक्षी धोनीचीही होणार चौकशी?

Last Updated: Wednesday, May 22, 2013 - 11:29

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग याला अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्राँच कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी हीची देखील चौकशी करणार असल्याचे समजते आहे. सहा एप्रिलला चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअममध्ये आयपीएल मॅच दरम्यान धोनीची पत्नी साक्षीच्या सोबत व्हीव्हीआयपी स्टँडमध्ये विंदू काय करीत होता? असाच प्रश्न विचारला जात आहे.
या मॅच दरम्यान व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसते आहे की, विंदू दारा सिंग आणि साक्षी अगदी बाजूला बसून मॅच पाहत होते. त्यांच्या सोबत महेंद्रसिंग धोनीचा मॅनेजरही होता. स्क्रिनवर त्यावेळेस तिघांनाही दाखविण्यात आलं होतं. जेव्हा धोनी बॅटींग करीत होता.
फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा सिंग याला काल अटक करण्यात आली. सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याने विंदूची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. बिग बॉसच्या तिसऱ्या सत्रातील विंदू दारा सिंग हा विजेता होता. विंदू अनेकदा आयपीएल मॅच पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असल्याचेही दिसून आलं आहे. तर त्यानंतर होणाऱ्या पार्ट्यांमध्येही विंदू दिसत असे. १४ मेला बुकी रमेश व्यास याला अटक केल्यानंतर त्याने विंदूचे नाव सांगितले. त्यानंतर त्याला जुहूच्या त्याच्या घरातून अटक करण्यात आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 22, 2013 - 11:14
comments powered by Disqus