सट्ट्यात २० लाख रूपये हरलो - मयप्पन

तब्बल तीन तासांच्या कसून चौकशीनंतर बेटींग प्रकरणी गुरूनाथ मयप्पन यांना अटक करण्यात आलीये सट्ट्यात २० लाख रूपये हरल्याची कबुली मयप्पननं दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 25, 2013, 08:39 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तब्बल तीन तासांच्या कसून चौकशीनंतर बेटींग प्रकरणी गुरूनाथ मयप्पन यांना अटक करण्यात आलीये सट्ट्यात २० लाख रूपये हरल्याची कबुली मयप्पननं दिलीय.
विंदू दारासिंगच्या चौकशीत मयप्पनचं नाव उघड झालं होतं. मयप्पन हा बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई असून तो चेन्नई सुपरकिंग्जचा CEO आहे. त्याला आज किला कोर्टात हजर करणार आहेत. गुरूनाथ मयप्पन IPLमध्ये बेटींक करत होता याचे पोलीसांना ठोस पुरावे सापडलेत. त्यामुळे मयप्पनला तात्काळ अटक करण्यात आलीये.

आज मयप्पनला किला कोर्टात हजर केलं जाणार आहे.. मयप्पन हा चेन्नई सुपर किंग्जचा CEO आहे त्यामुळे या संघ्याच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. बेटींग प्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्यानं आयपीएलचे सामने अडचणीत आलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.