मयप्पन पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, May 25, 2013 - 17:24

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २९ मेपर्यंत मयप्पन पोलीस कोठडीत राहणार आहे.
मयप्पनला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय सुनावला. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात गुरुनाथ मयप्पनला काल रात्री उशीरा अटक केल्यानंतर क्राईम ब्रांचच्या कार्यालयात त्याची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान मयप्पननं सट्ट्यात २० लाख रुपये हरल्याची कबुली दिलीय. मॅच फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या विंदू सिंग आणि मयप्पनची मुंबई क्राईम ब्रांचच्या कार्यालयात समोरासमोर चौकशी करण्यात आली. विंदूच्या चौकशीतूनच मयप्पनचं फिक्सिंग प्रकरणी नाव समोर आलं होतं. त्यामुळे आता २९ तारखेपर्यंत मयप्पन पोलीस कोठडीत राहणार आहे.

पोलिसांच्या चौकशी दरम्यान खळबळजनक माहिती समोर आली आहे. विंदू दारा सिंगचा वापर गुरुनाथ मध्यस्थ म्हणून करायचा. दोघांमध्ये सतत चर्चा व्हायची. संघाची रणनिती आणि माहिती गुरुनाथ विंदूला पुरवायचा. ही माहिती विंदू सट्टेबाजांपर्यंत पोहोचवायचा.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 25, 2013 - 17:16
comments powered by Disqus